अजित पवार रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, थेट नोटीस पाठवण्याची केली भाषा
GH News November 06, 2024 08:14 PM

रामराजे निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना ते दिसत नसल्याची चर्चा आहे. रामराजे निंबाळकर यांचे दोन्ही बंधू एक संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेले दीपक चव्हाण यांनीही तुतारी हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे फलटणचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी मिळाली. सचिन कांबळे हे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र महायुतीतून राष्ट्रवादीला फलटणची जागा सुटलीये. रामराजे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाला जागा सुटली तरीही रामराजे निंबाळकर प्रचारात दिसत नाही. रामराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. रामराजे निंबाळकर हे प्रचार करताना दिसत नाही, मी त्यांना नोटीस पाठवणार असं वक्तव्य अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, फलटणमध्ये कोणत्याच उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी रामराजे निंबाळकर यांची भूमिका आहे. तर फलटणचे आमदार अजित पवार गट राष्ट्रवादीकडून यापूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.