राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
जयदीप भगत, बारामती November 06, 2024 07:13 PM

Ajit Pawar Manifesto : विधानसभेच्या अनुषंगाने सर्व पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिध्द होत आहेत, आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या 50 मतदारसंघांसाठी वेगळा जाहीरनामा सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर बारामतीकरांसाठीचा जाहीरनाम्यात अनेक गोष्टींवर भर देण्यात येत आहे.

बारामतीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली आश्वासने काय?

बारामती शहराला कुस्तीची परंपरा आहे. त्यामुळे बारामतीत महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा आकादमी उभी करण्याची  घोषणा अजित पवारांनी केली आहे. या अकादमीमध्ये बॉक्सिग, कुस्ती, भालाफेक, शुटींग, पोहणे इत्यादी प्रकारचे खेळ शिकवून खेळाडू तयार केले जातील. त्याचबरोबर आधुनिक सुविधा, वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षण महाराष्ट्रातील खेळाडूंना दिले जाईल.

शेतकऱ्यांसाठी पाच हजार कृषी अधारित फूड प्रोसेसिंग युनिटचे एक नेटवर्क तयार केले आहे. यासोबतच बारामतीमध्ये लवकरच एक लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येईल, यामुळे स्थानिकांना आजूबाजूच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. बारामतीत जागतिक क्रीडा अकादमी सुरू करण्यात येईल. पंजाब आणि हरियाणातून प्रेरणा घेऊन अकादमी सुरू केली जाणार आहे. बॉक्सिंग आणि भालाफेक शिकवलं जाईल. बारामतीला पहिलं सौर ऊर्जा असलेलं शहर बनवलं जाणार आहे. बारामतीत कॅन्सरसाठी कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कर्करोगासाठी पुणे आणि मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. 

शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार

शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. 20 टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातील ग्रामीण भागात 45 हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.

जाहीरनाम्यात आणखी काय आहे?

लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार आहे.

सोबत महिला सुरक्षेसाठी  25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती 20% अनुदान देण्याचा वादा अजित दादांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे. 

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे. 

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे. 

25 लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.