रुपया विक्रमी खालच्या पातळीवर: अमेरिकन निवडणूक (US Election) निकालांचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे तसतसे डॉलर मजबूत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण (Indian rupee has fallen) होत आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज रुपया प्रति डॉलर 84.19 रुपये इतका नीचांकी पातळीवर दिसत आहे. हा ऐतिहासिक नीचांक आहे. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांच्या घसरणीने सुरू झाला. चलन डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी घसरुन 84.16 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. यापूर्वी मंगळवारी रुपया 84.11 च्या पातळीवर बंद झाला होता.
रुपयाची वाढती घसरण पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार आहे. बँकेला हस्तक्षेप करून रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपयावर उलट परिणाम झाला आहे.
चायनीज युआन ते कोरियन वॉन, मलेशियन रिंगिट आणि थाई चलनातही आज मोठी घसरण झाली आहे. हे चलन 1 टक्क्यांवरून 1.3 टक्क्यांनी घसरत आहेत. या दृष्टिकोनातून, टक्केवारीच्या दृष्टीने भारतीय चलन या आशियाई चलनांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. परंतू देशांतर्गत स्तरावर ते आधीच विक्रमी खालच्या पातळीवर पोहोचले आहे. डॉलर इंडेक्समध्ये 4 महिन्यांतील उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे. इंडेक्सने 1.5 टक्क्यांनी झेप घेत 105.19 वर पोहोचला आहे. ही वाढ विशेषत:
देशांतर्गत इक्विटींमधील कमकुवत स्थिती आणि अथक विदेशी भांडवलाचा ओघ यामुळं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 4 पैशांनी घसरून 84.11 (तात्पुरत्या) या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता. विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारतीय रुपयाने सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली आहे, जे नकारात्मक देशांतर्गत बाजारामुळे जवळपास 1.18 टक्क्यांनी घसरले आहे. आज रुपया प्रति डॉलर 84.19 रुपये इतका नीचांकी पातळीवर दिसत आहे. यूएस निवडणुकीच्या रन-अपमध्ये बाजार आधीच अस्थिरतेची चिन्हे दर्शवित आहे. या कठीण स्पर्धेत निकाल स्पष्ट झाल्यानंतर कल शांत होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त यूएस फेड या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या बैठकीत व्याजदर कपातीची घोषणा करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 1.64 टक्क्यांनी वाढून 105.11 वर व्यवहार करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..