Priya Bapat On Pregnancy : अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतीलही एक मोठा चेहरा आहे. अभिनेत्री प्रिया बापट हिने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती उमेश कामत ही इंडस्ट्रीमधील एक लाडकी जोडी आहे. प्रेक्षकांना ही जोडी खूप आवडते. ही जोडी नेहमीच नवनवीन कपल्स गोल सेट करत असते. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत, यानंतर ही त्यांचं नातं नवविवाहित जोडप्याप्रमाणे फारच गोड आहे. लग्नाला इतकी वर्ष होऊनही मुल नसल्याच्या प्रश्वावर प्रिया बापटने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे आदर्श कपल नेहमी एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. अलिकडेच एका मुलाखतीत प्रियाने उमेशसोबतच्या नात्याबाबत आणि मुल होण्यावर भाष्य केलं आहे. लग्नाला 13 वर्ष झाल्यानंतरही मुल का नाही, असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो, घरच्या मंडळीपेक्षा बाहेरचे लोक हा प्रश्न जास्त विचारतात, असं यावेळी प्रिया बापटने म्हटलं आहे. लग्नाच्या 13 वर्षानंतरही मूल नसण्यावर अभिनेत्री प्रिया बापटने स्पष्ट मत मांडलं आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि उमेशच्या रिलेशिनशिपबद्दल वक्तव्य केलं आहे. यावेळी प्रिया बापट म्हणाली की, "मला आता सतत बाळ होण्याच्या प्रश्वावर आता थकायला झालंय. लोकांचं प्रेम, लोकांची अपेक्षा काही असोत, पण मला घरच्यांनी याबद्दल विचारलं नाहीय, इतके वेळा बाहेरची मंडळी हा प्रश्न विचारतात. नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या एका काकूंनी मला प्रश्न विचारला होता की, गूड न्यूज कधी देताय?"
प्रिया पुढे म्हणाली की, "मला सुरुवातीला बाळसंबंधित प्रश्नांचा राग यायचा. हा सर्वस्वी माझा, माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही विचारणारे कोण? असं मला वाटायचं. पण, नंतर मला हळूहळू कळालं की, हे लोकांचं माझ्या आणि उमेशबद्दलचं प्रेम आणि जिव्हाळा आहे, म्हणून लोक वारंवार हा प्रश्न विचारत असावेत". प्रियाने यावेळी सांगितलं की, "मूल जन्माला घालण्यासाठी मी तुझ्यासोबत लग्न करत नाहीय, तर मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय म्हणून लग्न करतोय, मुलाचं जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू असं उमेश म्हणाला होता".
"मला वाटतं लग्न आणि मूल हा दबाव प्रत्येक स्त्रीवरुन आपण दूर करायला हवा. माझ्या लग्नाला 13 वर्षा झाली आणि मूल नाही. पण, हा पूर्णपणे माझा निर्णय आहे. उद्या मला वयाच्या 42 व्या वर्षी मूल जन्माला घालायची इच्छा असेल, तर मी घालेन आणि तेव्हा मला नाही वाटलं, तर नाही घालणार. पण, हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे, असं मला वाटतं. एका जोडप्याने मूल जन्माला घालायलाच हवं, असा अलिखित नियम आहे, तोच मला पटत नाही", असंही प्रियाने सांगितलं.
View this post on Instagram