Uddhav Thackeray lashed out at the Mumbai Police after preventing the security guards from entering the venue rrp
Marathi November 07, 2024 02:24 PM


सभास्थळी पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांना अडवले. यानंतर उद्धव ठाकरेंना राग अनावर झाला. आत घ्या सगळ्यांना पहिलं, कोण आहे तो त्याचं नाव घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. मुंबई येथील बीकेसी मैदानावर आज, बुधवारी (06 नोव्हेंबर) महाविकास आघाडीची सभा पार पाडली. मात्र या सभेआधी संयमी स्वभाव, कधीही न रागावणारे उद्धव ठाकरे हे भडकल्याचे पाहायला मिळाले. सभास्थळी पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षारक्षकांना अडवले. यानंतर उद्धव ठाकरेंना राग अनावर झाला. आत घ्या सगळ्यांना पहिलं, कोण आहे तो त्याचं नाव घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी गेले. (Uddhav Thackeray lashed out at the Mumbai Police after preventing the security guards from entering the venue)

मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीकडून संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सभागृस्थळी पोहचले होते. मात्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना सभास्थळी पोहचण्यासाठी थोडासा उशीर झाला. ते जेव्हा पोहचले तेव्हा सभास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना अडवले आणि आत प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ प्रवेशद्वारावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

– Advertisement –

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा आणि सर्व औषधे मोफत; खर्गेंकडून घोषणा

सुरक्षारक्षकांना पहिलं आत घ्या, असे म्हणत उद्धव ठाकरे मुंबई पोलिसांवर भडकले. कोण आहे तो? त्याचं नाव घेऊन ठेवा, असे उद्धव ठाकरेंनी पोलिसांनी उद्देशून म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यानेही नाराजी व्यक्त केली. एका कार्यकर्त्याने तर ‘गवळी, तुम्ही सगळ्यांना त्रास देताय’ असे म्हटले. मात्र या गोंधळावेळी संयमी भूमिका घेताना दिसणारे उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत दिसले. ते भडकल्यामुळे आजूबाजूला शांतता पसरली होती. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीनंतर उद्धव ठाकरे सभेच्या ठिकाणी गेले.

– Advertisement –

मुंबई नासवणारे कंत्राट रद्द करू

दरम्यान, सभेत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, संविधान बचाव हे जर फेक नरेटिव्ह वाटत असेल, तर धारावीचा जो मुद्दा आम्ही काढत आहोत. फक्त धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई ही अदानीच्या घशात घालण्याचे जे जीआर निघाले ते फेक नरेटीव्ह नाही का? अदानीच्या घशात धारावीची जागा घालण्याचा प्रयत्न होत आहे. हे लोक मुंबईला अदानीमय करत चालले आहेत. परंतु आमचे सरकार आल्यावर ज्या चुकीच्या निविदा काढल्या आहेत, ज्या सवलती अदानीला देऊन मुंबई नासवली जात आहे, ते कंत्राट रद्द करू. आम्ही धारावीकरांना सुविधा दिल्याशिवाय आणि घर दिल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : प्रत्येक महिलेला दरमहा 3 हजार रुपये खटाखट देणार – राहुल गांधी


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.