देवदास असो की परिणीता.. बॉलिवूडचे एकेकाळचे धमाकेदार चित्रपट घेतलेत 'या' फेमस पुस्तकांमधून
मुक्ता सरदेशमुख November 07, 2024 01:43 PM

Bollywood Films Inspired by books: बॉलिवूडनगरी ही अनेक धमाकेदार चित्रपटांची मांदियाळी. शाहरुख ऐश्वर्याचा देवदास असो किंवा विद्या सैफचा परिणीती असो बॉलिवूडच्या बॉक्सऑफीसवर धमाका करणारे कितीतरी  चित्रपट फेमस पुस्तकांमधून घेण्यात आले आहेत. कोणते आहेत हे चित्रपट आणि पुस्तकं?

देवदास घेतलाय या पुस्तकातून..

शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या क्लासिक कलाकृतींपैकी एक असणारा  देवदास हा सिनेमा २००२ मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलिज झाला आणि या सिनेमानं बॉलिवूडच्या इतिहासात नवा इतिहास रचला. शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या प्रसिद्ध कादंबरीतील ही पात्र या कलाकारांनी जिवंत केली आणि पारो आणि देवदासची शोकांतिका मोठ्या पडद्यावर चितारली. 

चेतन भगतच्या या पुस्तकातून घेतलाय थ्री इडियट्स

बॉलिवूडमधले काही चित्रपट जे कधीही पाहिले तरी कंटाळवाणे होत नाहीत, अशा चित्रपटांपैकीच एक असणारा थ्री इडियट्स हा सिनेमा. अमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या आनंदी आणि हृदयस्पर्शी मैत्रीची ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात कायमची ठसली. 2oo9 मध्ये आलेल्या या चित्रपटाची कथा चेतन भगतच्या 5 point someone  या पुस्तकातून मोठ्या पडद्यावर आली आहे.

परिणीता 

ललिता आणि शेखर यांची बंगाली प्रेमकहाणी आणि नंतर झालेल्या गैरसमजांवर आधारलेली परिणीता फिल्म ही शरदचंद्र चटोपाध्यायांच्या क्लासिक पुस्तकावरून घेण्यात आलेली कथा आहे.  सैफ अली खान, विद्या बालन आणि संजय दत्त यांच्या मनावर कोरल्या गेलेल्या भूमिकांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. या चित्रपटातील गाणीही अत्यंत आवडीनं ऐकली गेली.

शेक्सपिअरच्या ऑथेलोवर आधारित हा सिनेमा आठवतोय?

शेक्सपिअरच्या ऑथेल्लो या पुस्तकावरून प्रेरित झालेला अजय देवगण करीना कपूर यांचा ओंकारा चित्रपटही पुस्तकावरून घेण्यात आला आहे. ईर्षा, प्रेम, विश्वासघाताच्या थीमवर आधारित असून २००६ साली हा सिनेमा रिलिज झाला होता. 

आलिया विकी कौशलचा राझी सिनेमा या पुस्तकावर

आलिया भट्ट आणि विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असणारा राझी चित्रपट बॉलिवूडचा एक गाजलेला चित्रपट आहे.भारत पाकिस्तानच्या कुरघोड्यांमध्ये पाकिस्तानात लग्न करून गेलेली भारतीय गुप्तहेर सेहमत अनेकांच्या लक्षात राहिलेली. २०१८ साली प्रदर्शित झालेला राझी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यातील गाणीही प्रेक्षकांनी उचलून धरली.  भारतीय गुप्तहेराच्या सत्यकथेवर असणाऱ्या कॉलिंग सेहमत या हरिंदर सिक्का यांच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.