एक निबंध लिहा नि शिक्षणासाठी अमेरिकेला जा, काय आहे ही योजना, काय करावे लागणार?
GH News November 07, 2024 03:17 PM

परदेशात शिक्षणासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळतात. काही सरकारकडून असतात. तर काही शिष्यवृत्ती तिथली विद्यापीठं देतात. काही संस्था पण होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करतात. अमेरिकेसारख्या महागड्या देशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अत्यंत आवश्यक असते. अर्थात ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. पण काही शिष्यवृत्ती अगदी सहज मिळतात. तर ही शिष्यवृत्ती पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागते. एक निबंध लिहावा लागतो.

निबंध लिहा, Saivian Eric Dalius Scholarship मिळवा

अमेरिकेत जाण्यासाठी सॅवियन एरिक डेलियस स्कॉलरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. ही शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येते. व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण आणि ब्लॉगिंग क्षेत्रात पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावते. अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. सॅवियन एरिक डेलियस शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक निंबध लिहावा लागणार आहे. हा निबंध 1000 शब्दांपेक्षा जास्त नसावा. हा निबंध लिहून झाल्यावर तो Word Document वा गुगल डॉक फाईलमध्ये जतन करून, apply@ericdaliusscholarship.com या ई-मेलवर पाठवावा लागणार आहे.

ही माहिती देणे आवश्यक

अर्जदाराचे संपूर्ण नाव द्यावे लागेल

अर्जदाराचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल

अर्जदाराला त्याचा ई-मेल आयडी द्यावा लागेल

त्याच्या शिक्षणाची संपूर्ण माहिती त्याला द्यावी लागेल

ज्या विद्यापीठात, महाविद्यालयात त्याने पुढील शिक्षणासाठी अर्ज केला आहे. तिथे शिक्षणाची तयारी केली आहे, त्या संस्थेचे नाव, संपूर्ण पत्ता आणि इत्यंभूत माहिती द्यावी लागेल. याविषयीची माहिती अर्जदाराला 290 शब्दांमध्ये सांगावी लागेल.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय?

जे विद्यार्थी अमेरिकेतील महाविद्यालय अथवा विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यांना Saivian Eric Dalius Scholarship देण्यात येईल. जे विद्यार्थी सध्या अमेरिकेत आहेत. अथवा ज्यांनी तिथल्या विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या अर्जासोबत तुम्हाला हजार शब्दांचा एक निबंध लिहून द्यावा लागेल. एका विद्यार्थ्याला 84 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती दोन विद्यार्थ्यांना देण्यात येते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.