2200 कोटी रुपयांचा आयपीओ आजपासून उघडला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभारले 990 कोटी
ET Marathi November 07, 2024 05:45 PM
मुंबई : सामान्य विमा क्षेत्रातील कंपनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा आयपीओ आज 7 नाेव्हेंबरपासून सुरू होत आहे. कंपनीच्या 2,200 कोटी रुपयांच्या या आयपीओमध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत बोली लावता येईल. प्रति शेअर किंमत 70 ते 74 रुपये निश्चित करण्यात आली आहे. अँकर गुंतवणूकदारांकडून 990 कोटी उभारलेया आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख 6 नोव्हेंबर होती. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीला 990 कोटी रुपये मिळाले आहेत. आयपीओमध्ये देशी-विदेशी कंपन्यांनी पैसे गुंतवले आहेत. जूलिया इन्वेस्टमेंट्स पीटीई, अमांसा होल्डिंग्स, ए91 इमर्जिंग फंड II एलएलपी, मॉर्गन स्टेनली, फिडेलिटी आणि गर्व्हमेंट पेन्शन फंड ग्लोबलसारख्या विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी केले आहेत. याव्यतिरिक्त, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड (एमएफ), ॲक्सिस एमएफ, टाटा एमएफ आणि डीएसपी एमएफ यांचाही अँकर गुंतवणूकदारांमध्ये समावेश आहे. ऑफर फॉर सेल निवा बुपाने आयपीओची किंमत 70-74 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या आयपीओमध्ये 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. प्रवर्तकांकडून 1,400 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकले जातील. कंपनी सुरुवातीला 3,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत होती. परंतु नंतर आयपीओ आकार कमी केला. शेअर्सचे लिस्टिंग शेअर्सचे वाटप 12 नोव्हेंबरला होऊ शकते. तर रिफंड प्रक्रिया 13 नोव्हेंबरला होणार आहे. यशस्वी अर्जदारांचे डिमॅटमधील शेअर्स 13 नोव्हेंबर रोजी हस्तांतरित केले जातील. बीएसई आणि एनएसईवर शेअर्सचे लिस्टिंग 14 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ शकते. कंपनीची स्थापना कधी या आरोग्य विमा कंपनीची स्थापना 2008 साली झाली. हा बुपा ग्रुप आणि फेटल टोन एलएलपी यांचा संयुक्त उपक्रम आहे. पूर्वी या कंपनीचे नाव मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी होते. नंतर ते निवा बुपा हेल्थ इन्शुरन्समध्ये बदलले गेले. बुपा सिंगापूर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडचा या आरोग्य विमा कंपनीमध्ये 62.19 टक्के तर फॅटल टोन एलएलपीकडे 26.8 टक्के हिस्सा आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.