दिवाळीनंतर तुलसीविवाहाची वाट काही विवाहास इच्छुक मंडळी पाहत असतात. कारण, तुलसीचा विवाह पार पडला की लग्नकार्यास मुहूर्त मिळतो. चातुर्मासाच्या काळात विवाह करणे योग्य नसते. त्यामुळेच, लग्नासारख्या पवित्र कार्यासाठी योग्य मुहूर्त शोधला जातो.
तुलसीविवाह लवकरच होणार आहे. त्यामुळे ज्या मंडळींना लग्न ठरवली आहेत, अशांसाठी हा काळ एन्जॉय करण्याचा आहे. अशातच प्री-वेडींग शूट करण्याचे फॅड आहे. लग्नापूर्वी वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मिडिया अन् चक्क लग्नाच्या मंडपात दाखवले जातात.
प्री-वेडींग करायचं ठरलं की त्यासाठी योग्य लोकेशन शोधलं जातं. कारण, कपल्ससाठी बेस्ट ठरेल अन् त्यांना प्री-वेडींग नेहमी लक्षात राहील अशा ठिकाणी करायचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईत तुम्ही कुठे प्रीवेडींग करू शकता हे सांगणार आहोत.
मुंबईत राहणारे, काम करणारे तरूण-तरूणी प्रीवेडींगसाठी वेगळा वेळ काढू शकत नाहीत. तसेच, मुंबई बाहेर शूट करण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी काढावी लागेल. पुढे लग्नासाठीही काही दिवस सुट्ट्या घ्याव्या लागणार असतात. त्यामुळे तुम्ही मुंबईतच कुठे प्रीवेडींग करू शकता याचे काही बेस्ट ऑप्शन्स आपण पाहणार आहोत.
गेटवे ऑफ इंडियाजगभरात कितीही फिरलं तरी मुंबईत येऊन गेटवे ऑफ इंडियासमोर फोटो नाही काढला तर काय उपयोग. तुम्ही मुंबईत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. मुंबईची ओळख असलेल्या गेट-वे ऑफ इंडियासमोर तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता. ताजमहाल हॉटेल देखील समुद्राच्या समोर आहे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी मुंबई हे उत्तम ठिकाण आहे.
मरीन ड्राइव्हमुंबईत येणारा प्रत्येक माणूस हा मरीन ड्राइव्हला क्वीनचा नेकलेस म्हणूनही ओळखला जातो. मरीन ड्राइव्ह वर काही लोकांच्या प्रेमकथा या इथूनच सुरू झालेल्या असतात. तर काहींनी इथे एकत्र भेटून स्वप्न रंगवलेली असतात. एका बाजूला समुद्र आणि दुसरीकडे रस्ता प्रेमाच्या आठवणी जागवणाऱ्या या ठिकाणी फोटो काढले तर ते नेहमी लक्षात राहणारे ठरतील.
बँडस्टँडजर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट करण्यासाठी जागा शोधत असाल. तर बांद्रा बँडस्टँड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, रोमँटिक फोटोशूटसाठी बँडस्टँडमध्ये एक किल्ला आहे, एक छोटासा बागिचा आहे, अथांग समुद्र आणि बिच आहे. इथल्या किनाऱ्यावर शूट केले तर तुम्हाला कोकणात गेल्याचा फिल येईल.
जुहू बीचमुंबईचा लोकप्रिय बीच जुहू बीच आहे. इथे तुम्हाला रोमँन्टीक वातावरणात फोटो काढता येतील. प्री-वेडिंग शूटसाठी योग्य ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे, तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट देखील करू शकता.
जुहू बीच