Raj Thackeray Ghatkopar Speech : मुंबईतील (Mumbai) सगळे टोल नाके बंद झाले आहेत. त्याबद्दल कोणीही बोलत नाहीत. इतर कोणत्याही राजकीय पक्षाने या मुद्दा उचलला नाही. कारण सगळ्यांचे हात त्या टोलमध्ये अडकले होते असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. सत्तेत नसताना आम्ही अनेक विषय मार्गी लावल्याचे राज ठाकरे म्हणाले. पुढच्या दोन दिवसात पक्षाचा जाहीरनामा येणार आहे. त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे आमची सत्ता आल्यास राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा ठेवणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. रस्ते अडवून पाडले जाणारे नमाज बंद करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं सरकार असताना आम्ही मशिदीवरील भोंगे आम्ही बंद केले. यावेळी 17000 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीतर आम्ही सांगितलं होतं, की त्यापुढे हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले. पुण्यात एका मुस्लिम पत्रकाराने सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. मशिदीवर भोंगे काढण्याचा तुमचा निर्णय योग्य असल्याचे त्या पत्रकाराने सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले.
सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. यामुळं लोकांची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली असल्याचे राज ठाकरे म्हणाले. पण मनसेनं ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत असेही राज ठाकरे म्हणाले. रेल्वे भरतीसाठी मनसेनं आंदोलन केलं, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरुणांना दिल्या जात होत्या.या परिक्षांची इंथ जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण? असा सवालही राज ठाकरेंनी केला. इथून दिल्लीत जाणाऱ्या खासदार मंत्र्यांनी काय केलं? यावर संसदेत का कुणी बोललं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला. जर हे महाराष्ट्राच्या उपयोगीच पडणार नसतील तर का निवडून द्यायचं यांना? असा सवालही त्यांनी केला.