मुंबई : चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (Chambal Fertilizers and Chemicals Limited-CFCL) ने बुधवार 6 नोव्हेंबर रोजी चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले की सप्टेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 40.8 टक्क्यांनी वाढून 536.4 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत नफा 381 कोटी रुपये होता.
अंतरिम लाभांश तिमाही निकालांसोबतच चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्सच्या संचालक मंडळाने भागधारकांना अंतरिम लाभांशही जाहीर केला. कंपनीने सांगितले की, भागधारकांना प्रति शेअर 5 रुपये अंतरिम लाभांश दिला जाईल. लाभांशाची रक्कम 5 डिसेंबरपर्यंत दिली जाईल.
महसूल घटलामात्र, या तिमाहीत चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्सचा महसूल 19.3 टक्क्यांनी घसरून 4,346.2 कोटी रुपयांवर आला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत हा आकडा 5,385.5 कोटी रुपये होता. कंपनीचा EBITDA 28.5 टक्क्यांनी वाढून 790.2 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 615 कोटी रुपये होता. त्याच वेळी या कालावधीत EBITDA मार्जिन वाढून 18.2 टक्के झाले. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते 11.4 टक्के होते.
शेअर्सचा परतावाबुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद झाल्यानंतर चंबल फर्टिलायझर्सने त्यांचे निकाल जाहीर केले. निकालापूर्वी कंपनीचे शेअर्स 3.88 टक्क्यांच्या वाढीसह एनएसईवर 502.90 रुपयांवर बंद झाले. तर गुरुवारी शेअर्स वाढून 526.50 रुपयांवर पाेहाेचले आहेत. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स सुमारे 32.29 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 73.20 टक्के परतावा दिला आहे.
कंपनीचे मार्केट कॅपशेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 575 रुपये आणि नीचांक 288.40 रुपये आहे. चंबल फर्टिलायझर्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 12.35 टक्के खाली व्यवहार करत आहेत. त्याच वेळी 52 आठवड्यांच्या नीचांकी वरून ते 75.03 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीचे मार्केट कॅप 20,180.86 कोटी रुपये आहे.