Aaj che Havaman (आजचे हवामान): थंडीचा जोर हळूहळू वाढतोय! मुंबई, पुण्यासह राज्यात आज कसं राहील हवामान? वाचा
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचे आगमन झाले आहे. हळूहळू तापमानात घट होत असून गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा जाणवत आहे. तापमानाचा पारा हळूहळू घटत असल्याने राज्यातील थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने थंडीची चाहूल काहीशी उशीराल लागली आहे. असे असले तरी थंडीचा जोर जाणवत आहे. पुढच्या काही दिवसात थंडीचा हा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
पावसाने राज्यातून पूर्णपणे माघार घेतली आहे. असे असले तरी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होत कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी देखील कोसळत आहे. तर दुसरीकडे राज्यातील तापमानात घट होताना देखील दिसून येत आहे. पहाटच्या वेळी विशेषतः तपमानात घट नोंदवली जात आहे. तर दुपारी तापमानामध्ये चढ-उतारची स्थिती बघायला मिळत असून दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहे.
पुढचे 3 दिवस तापमानात घट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानत घट जाणवत आहे. विशेषतः 5 नोव्हेंबरपासून तापमात सातत्याने घट होत आहे आणि पुढचे तीन दिवस देखील ही स्थिती कायम राहणार आहे. अशात राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान जळगाव जिल्ह्यात नोंदवण्यात आले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य व पूर्व भारतात 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेच्या तापमानात घट होणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर देखील होईल.
पावसाची उघडीप
दरम्यान, यंदा परतीचा पाऊस लांबत नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. परतीचा पाऊस लांबल्याने राज्यात थंडीचे आगमन देखील उशीराने झाल्याची स्थिती आहे. पावसाने उघडीप दिल्याने आता गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात एक दोन ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद वगळता इतरत्र हवामान कोरडे होते.
मुंबईच्या तापमानत वाढ
राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत असताना काही भागातील तापमानात वाढ नोंदवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविण्यात आली. तर पुणे परिसरात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी पुढचे काही दिवस हवामान कोरडेच राहण्याची स्थिती आहे.