Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अशातच माढा विधानसभा (Madha Vidhansabha) मतदारसंघाची राज्यभर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. माढा विधानसभा मतदारसंघात सध्या तिरंगी लढत होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अभिजीत पाटील, महायुतीकडून अजित पवार गटाच्या मिनल साठे तर माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र, या सगळ्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव सावंत हे महायुतीचं तिकीट न मिळाल्यामुळं नाराज आहेत. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. ते 9 तारखेला त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शिवाजीराव सावंत हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. माढा तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून शिवाजीराव सावंत हे राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. कारखानादारीच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी मोठं जाळ निर्माण केलं आहे. ते सध्या शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम करत आहेत ते यावेळी माढा विधानसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांनी उमेदवारी दिली नाही. काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली. त्यामुळं शिवाजी सावंत हे नाराज आहेत. त्यामुळं शिवाजी सावंत नेमका कोणता निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. कारण माढा तालुक्याचा आमदार होण्यासाठी शिवाजी सावंतांची भुमिक महत्वाची आहे. त्यांना मानणारा मोठा वर् माढा तालुक्यात आहे. त्यामुशं सावंत सर हे शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांना पाठिंबा देणार की अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना की अजित पवार गटाच्या मिनल साठे यांना पाठिंबा देणार हे पाहमं महत्वाचं ठरणार आहे.