Mumbai Local Train: सोशल मीडियावर आपल्याला कायम अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात, या व्हायरल व्हिडिओत जास्तीत जास्त व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील असतात. कारण लोकल ट्रेनमध्ये दररोज अनेक गोष्टी घडत असतात. त्यात पुन्हा एकदा सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र सध्या लोकल ट्रेन वादविवाद नसून चक्क पाणीपुरी विकताना एक व्यक्ती दिसत आहे.
(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन दिसत आहे. ज्या लोकल ट्रेनमधला एक डब्बा दिसत आहे. ज्यामध्ये प्रवाशांची गर्दी आहे. मात्र व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती चक्क पाणीपुरी विकताना दिसत आहे तर एक व्यक्ती (Panipuri) खाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. मात्र यांना पाहून अनेक व्यक्ती हैराण झालेले व्हिडिओत दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होताना दिसून येत आहे.
लोकल ट्रेनमधील व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@vijay_dhawle'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''मुंबई लोकलमध्ये काहीही होऊ शकते'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सर्वत्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे आज हे काय पाहिले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.