Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आज (०७ नोव्हेंबर) त्याच्या नवीन मनेजमेंट टीमची घोषणा केली. 'स्पोर्टिंग बियॉन्ड' असं विराटच्या मॅनेजमेंट टीमचे नाव असून ही टीम विराटचे व्यवसायिक कामकाज सांभाळेल.
नव्या टीमची घोषणा करताना विराट म्हणाला, " 'स्पोर्टिंग बियॉन्ड' या माझ्या नवीन व्यवस्थापकीय टीम सोबत नवीन सुरुवात करताना मला खूप आनंद होत आहे. ही टीम काही काळापासून माझ्यासोबत काम करत आहे.'
'स्पोर्टिंग बियॉन्ड टीम माझी उद्दिष्टे आणि पारदर्शकता, सचोटी आणि खेळावरील प्रेम आणि माझी मूल्ये या सर्वांशी बांधील आहे. हा माझ्यासाठी एक नवीन अध्याय आहे. कारण मी माझ्या नवीन व्यस्थापकीय टीमसह भागीदारीसाठी उत्सुक आहे. जी माझ्या सर्व व्यावसायिक हितसंबंधांवर माझ्यासोबत काम करेल."
याआधी विराटचे व्यवसायिक कामकाज 'कॉर्नरस्टोन' या नामांकित सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी सांभाळायची. ज्यामध्ये बंटी सजदेह हा त्याचा दीर्घकाळ मॅनेजर होता.पण, कॉर्नरस्टोन कंपनी सोबतचा करार संपल्यानंतर काही महिन्यांनी विराटने हा निर्णय घेतला आहे.
कोहली हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. क्रोल्स सेलेब्रिटी ब्रॅंड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार, त्याची ब्रँड व्हॅल्यू २९% ने वाढून २२७.९ दशलक्ष डॉलर्स झाली आहे. सोबतच विराट अनेक ब्रॅंड्सचा ब्रॅंड ब्रँड ॲम्बेसेडर आहे. विराटचेही सोशल मीडियावर कोटींमध्ये फॉलोवर्स आहेत. त्यामुळे विराटला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सेलेब्रिटी मानले जाते.