गडचिरोलीत शेतांमध्ये जंगली हत्तींचा मुक्त संचार, शेतकऱ्यांचे नुकसान
Webdunia Marathi November 07, 2024 11:45 PM

गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला वन परिक्षेत्रातील पिपरटोला गावातील शेताच्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने घुसून शेकडो हेक्टरवरील भातपिक पायदळी तुडवले. यामध्ये सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पोर्ला वन परिक्षेत्र आणि एफडीसीएम जंगलात रानटी हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. जंगली हत्ती शेतात घुसून भातपिके पायदळी तुडवत आहे. जंगली हत्तींच्या कळपाने पोर्ला वनपरिक्षेत्रातील पिपरटोला गावातील शेताच्या आवारात घुसून शेकडो हेक्टरवरील भातपीक पायाखाली तुडवले. यामध्ये सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रानटी हत्तींचा टोळी जिल्ह्यातील जंगलात धुमाकूळ घालत आहे. या काळात जंगली हत्तींनी शेतातील पिकांसह लोकांची घरे उद्ध्वस्त केली आहे. जंगली हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नुकसान झालेल्या शेतजमिनीचा पंचनामा वनविभागाकडून करण्यात आला आहे. पण एवढ्या मोठ्या झालेल्या नुकसानमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.