AUS vs PAK : पाकिस्तान पलटवार करणार की ऑस्ट्रेलिया सलग दुसरा सामना जिंकणार?
GH News November 08, 2024 12:09 AM

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करु असं म्हणणाऱ्या मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पराभवूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर पहिल्या सामन्यात 4 नोव्हेंबरला 2 विकेट्स विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या चुरशीच्या झालेल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानतंर आता दोन्ही संघ दुसरा आणि निर्णायक सामना खेळण्यासाठी तयार आहेत. पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर हा दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामनाच मालिकेच्या तोडीचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया सलग दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी तयार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया यशस्वी ठरणार की पाकिस्तान पलटवार करणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी 8 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना एडलेड ओव्हर येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, फैसल अक्रम, हसीबुल्ला खान, आमेर जमाल आणि अराफत मिन्हास.

ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, सीन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, कूपर कॉनोली आणि जोश हेझलवूड.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.