Shivsena UBT Manifesto : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा वचननामा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला. या वचननाम्यात त्यांनी कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करणार, मुंबईतून पळवलेलं वित्तिय केंद्र धारावीत नव्याने उभारणार. मुंलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणार. जुनी पेन्शन योजना लागू करणार आणि बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे.
Rahul Gandhi : पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजीराहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू केल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयाला सरकारी यंत्रणांनी माहिती दिली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी याबाबतची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानुसार राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची पुण्यातील आजची पत्रकार परिषद रद्द!जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून टीका केली जात आहे. शिवाय महायुतीत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शरद पवारांवरील वैयक्तिक टीका खपवून घेणार नसल्याचा इशारा खोत यांना दिला आहे. अशातच आता खोत यांनी पुण्यात होणारी पत्रकार परीषद पुढे ढकलण्यात आली आहे. पुर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे पत्रकार परीषद घेणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशारा दिला होता.
Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या 9 दिवसांत 50 सभाभाजप आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राज्यात नऊ दिवसांत पन्नास सभा होणार आहेत.
Raj Thackeray : सत्ता आल्यास एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही - राज ठाकरेमनसेचे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांवर भाष्य केलं आहे. माझ्या हातात सत्ता दिल्यास एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा थोड्याच वेळात प्रकाशित होणारउद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. तर या वचननाम्यातून ठाकरे जनतेला कोणती आश्वासन देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.