Salman Khan Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकी देणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ असल्याची ओळख सांगितली आहे. तसेच त्याने धमकी देताना 5 कोटी रुपयांची मागणीही केलीये. या सगळ्या प्रकरणावर आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
उज्वल निकम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. उज्वल निकम यांनी म्हटलं की, आता हे स्पष्ट झाले आहे की बिश्नोई टोळी सलमान खानला वारंवार धमकीचे फोन करत आहे. या धमक्यांचे स्पष्ट कारण पोलिसांना समजल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.नवीन कायद्यानुसार पोलिस फरार आरोपींवरही आरोपपत्र दाखल करू शकतात आणि न्यायालय अशा आरोपींना ठोस पुराव्याच्या आधारे दोषी ठरवू शकते.
दरम्यान, सलमान खानला धमकावल्याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. हा मेसेज हुबळी येथून आल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांचे एक पथक कर्नाटकात पाठवण्यात आले आहे. तेथून एका 35 वर्षीय व्यक्तीला जो वेल्डिंगचे काम करतो त्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने धमकीचे मेसेज पाठवल्याचा संशय असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या धमकीच्या मेसेजमध्ये सलमान खानला काळवीटाच्या शिकारीच्या कथित घटनेबद्दल माफी देखील मागण्यास सांगितलं आहे.
सोमवारी रात्री उशिरा वरळी परिसरात असलेल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा संदेश आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संदेश पाठवणाऱ्याने तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे. संदेशानुसार, “जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या (बिष्णोई समाजाच्या) मंदिरात येऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत, असं म्हणत सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
#WATCH | Speaking on fresh threat to Actor Salman Khan, Advocate Ujjwal Nikam says, "It is now more than clear that the Bishnoi gang is giving threat calls to the Bollywood actor time and again. When the Police find the origin of these threats then, they will file a case. Under… pic.twitter.com/L11K7Ms3jR
— ANI (@ANI) November 5, 2024