श्वेताताईंनी मतदार संघाचे रुपडे पालटले! जागृत जनता रेकॉर्ड मताधिक्याने विजय करेल! विजय कोठारींचे प्रतिपादन...! शंतनु बोंद्रे म्हणाले, श्वेताताईंनी विकासाचा अनुशेष भरून काढला...
Buldanalive November 07, 2024 11:45 PM

 महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ म. खंडाळा, शेलगाव ज., एकलारा पांढरदेव भोरसा भोरसी, नायगाव बु, कारखेड, पिंपरखेड, हराळखेड, धानोरी आणि इसोली येथे गाव भेट दौऱ्याचे आयोजन दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. प्रत्येक गावात या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी गावातील नागरिक व माता - भगिनींकडून आ. श्वेताताई महाले यांचे उस्फुर्त स्वागत झाले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, पांढरदेव येथील सरपंच चेतन म्हस्के, शिवसेना नेते भास्करराव राऊत, गजानन परिहार, शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, बबनराव राऊत, माजी पंचायत समिती सदस्य गजानन ठेंग, बद्री पानगोळे, मंदार बाहेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ तायडे, अमोल साठे, धर्म जागरण जिल्हाप्रमुख गजानन महाराज सपकाळ, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण अंभोरे, युवराज भुसारी, सतीश काकडे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पीरिपा महायुतीमधील पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. 

श्वेताताईंनी भरून काढला विकासाचा अनुशेष - शंतनू बोंद्रे

          शेतकरी, शेतमजूर, दलित, महिला आणि सर्वसामान्य माणसाच्या समस्यांची जाण असलेल्या नेत्या श्वेताताई महाले यांच्या रूपाने चिखली मतदारसंघाला एक खंबीर नेतृत्व लाभले आहे. आपल्या कल्पकतेने व धडाडीने त्यांनी चिखली मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढत प्रगतीचे नवे मार्ग येथील जनतेला दाखवले. श्वेताताईंची अडीच वर्षातील कामगिरी ही काँग्रेस उमेदवाराच्या दहा वर्षाच्या कार्यकाळावर निश्चितच भारी असून त्याची परतफेड मतदानाच्या रूपातून या मतदारसंघातील जनता निश्चितच करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.