निगडी प्राधिकरणातील सार्वजनिक ठिकाणी रहिवासी भागात किराणा दुकानदार सिगारेट विकत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होत आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने याबाबत कारवाई करावी. - एक नागरिक
इंद्रायणीनगरमध्ये बुलेटस्वारांचे ‘फटाके’
इंद्रायणीनगरमध्ये वैष्णोमाता मंदिराजवळ काही बुलेटस्वार सायलेन्सरचा मोठ-मोठ्याने फटाके वाजवत असल्याप्रमाणे रात्री अपरात्री आवाज काढत असतात. त्यामुळे परिसरातील लहान मुले आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तरी, अशा लोकांचा बंदोबस्त करावा.
- एक नागरिक
मडिगेरी उद्यानाशेजारी उघड्यावर कचरा
इंद्रायणीनगर- मडिगेरी उद्यानाशेजारील नाल्याजवळ परिसरातील नागरिक उघड्यावर बऱ्याच महिन्यांपासून कचरा टाकत आहेत. कामानिमित्त भोसरीतून एमआयडीसीमध्ये जाणारे नागरिक कचरा टाकून जातात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सफाई कामगार नित्यनियमाने रोज कचरा उचलत असतात. महापालिकेने संबंधित ठिकाणी निरीक्षक ठेवावा आणि कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष्य ठेऊन कडक कारवाई करावी.
- एक नागरिक
---