भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवार (8 नोव्हेंबर) पासून चार सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला आहे. मालिकेच्या पूर्वसंध्येला सूर्यानं पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यानं भारतीय कर्णधार रोहित शर्माची भरपूर प्रशंसा केली.
सूर्यकुमार यादवनं कबूल केलं की तो रोहित शर्माची नेतृत्व शैली फॉलो करतो. सूर्या मैदानाबाहेरही त्याच्या संघासोबत बराच वेळ घालवतो, जे त्याच्या मैदानावरील कामगिरीवर दिसतं. रोहितप्रमाणेच, सूर्यकुमार देखील आपल्या खेळाडूंची मानसिकता समजून घेतो आणि त्यांना एकजूट ठेवण्यासाठी आणि कठीण काळात संतुलन राखण्यासाठी प्रेरित करतो.
सूर्यकुमारला जेव्हा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारताच्या पराभवाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, जिंकणं आणि हरणं हा खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. सर्वांनी मेहनत घेतली आहे. काहीवेळा तुम्ही चांगली कामगिरी करता तर काही वेळा नाही. सूर्या म्हणाला की तो रोहितकडून खूप काही शिकला आहे.
सूर्यकुमार म्हणाला की रोहित हा फक्त कर्णधार नसून तो एक लीडर आहे. सूर्या म्हणाला, रोहित हा असा लीडर आहे जो एका विशिष्ट फॉर्मेटमध्ये कसं खेळायचं हे ठरवतो. जेव्हा मी मैदानात असतो, तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष देत असतो. त्याची देहबोली काय आहे, तो आपल्या गोलंदाजांशी कसा बोलतो आणि मैदानावर व मैदानाबाहेर तो सर्वांशी कसा संवाद साधतो, तो त्याच्या खेळाडूंशी कसा वागतो आणि त्याच्याकडून त्याला काय हवं आहे हे मला माहीत आहे.”
भारतात झालेल्या गेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेद्वारे कसोटी पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारला 2023 एकदिवसीय विश्वचषकानंतर केवळ टी20 फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा –
भारताची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी सज्ज! मोबाईलवर कुठे पाहायचा सामना? जाणून घ्या सर्वकाही
निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये का खेळायचं आहे? 42 वर्षीय जेम्स अँडरसननं सांगितलं कारण
भारतीय फलंदाज सराव सामन्यातही ढेपाळले, बॉर्डर-गावस्कर मालिकेत काय होणार?