यंदा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) सरकार २८ कोटी रुपये खर्च करत आहे, हाच खर्च वर्ष २०२० मध्ये १२ कोटी होता, म्हणूनच आता या खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी GPCC चे प्रवक्ते अमरनाथ पणजीकरांनी केली आहे.
'कॅश फॉर जॉब'; घोटाळ्याची व्याप्ती वाढली; दीपश्रीचा आणखी एक कारनामा समोरनोकरी देण्याच्या बहाण्याने ४४ जणांची सुमारे ४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ॲड.शैलेश गावस यांच्याकडून दीपश्री सावंत देसाई यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निलंबित LPC तनिष्का म्हणतेय "आम्ही निर्दोष आहोत""पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडेचा आम्ही छळ केलेला नाही, आम्ही निर्दोष आहोत" असे निलंबित एलपीसी तनिष्का चव्हाणचे म्हणणे आहे.
साखळीत लवकरच प्रशस्त पशुवैद्यकीय इस्पितळ!अगरवाल फाऊंडेशन आणि साखळी पालिकेच्या सामंजस्य करारानुसार साखळीत लवकरच प्रशस्त पशुवैद्यकीय इस्पितळाची होणार उभारणी होणार आहे. अनील अगरवाल फाऊंडेशनच्या अध्यक्ष प्रिया अगरवाल व नगराध्यक्ष सिध्दी प्रभू यांनी प्रस्तावीत इस्पितळाच्या जागेची पाहणी केली.
सुचना सेठ प्रकरणात हॉटेल मॅनेजरचे स्टेटमेंट समोरस्वतःच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येची संशयित आरोपी सुचना सेठ हिला आज (दि.७ ऑक्टबर) रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीच्यावेळी हॉटेल मॅनेजरने त्याचे स्टेटमेंट न्यायालयासमोर सादर केले. बाल न्यायालयाने हे स्टेटमेंट मान्य केले असून संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी केली जाईल.
पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन्ही एलपीसी निलंबितएलपीसी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना २२ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी गावडे याने व्हिडिओ संदेशामधून दोन्ही एलपीसी त्याचा मानसिक छळ करीत आल्याचा दावा केला होता.
राष्ट्रपतींचे गोव्यात आगमन; मुख्यंमत्री सावंत आणि मंत्री माविन गुदिन्होंनी केले स्वागतमुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री माविन गुदिन्हो यांनी भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांचे आयएनएस हंसा येथे स्वागत केले.
राष्ट्रपती आज गोव्यात येणार!भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू आज गोव्यात येणार आहेत.
'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणातील पूजा नाईक अन्य एका प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील पूजा नाईक अन्य एका प्रकरणात पर्वरी पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. डिचोली न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून, एकूण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ट्रान्सफर वॉरंटवर पर्वरी पोलिसांनी पूजा नाईक हिला ताब्यात घेतले.