Viral: 'सण प्रत्येकासाठी सारखेच नसतात!' दिवाळीत डिलिव्हरी बॉयने तब्बल 6 तास काम केलं, पण कमाई पाहाल तर डोळे भरून येतील
ज्योती देवरे November 08, 2024 11:13 AM

Viral: दिवाळीचा (Diwali 2024) सण अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिवाळीत अनेकांना सुट्ट्या असल्याने एकीकडे लोक आपला आनंद साजरा करत होते, तर दुसरीकडे मात्र ही दिवाळी प्रत्येकासाठी सारखीच नव्हती असं दिसून आलं. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने सोशल मीडियावर त्याची दिवाळीतील कमाई दाखवणारा एक व्लॉग शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही युजर्स त्या व्यक्तीला सॅल्यूट करताना दिसत आहेत, तर काही लोक कंपनीवर प्रश्नही उपस्थित करताना दिसत आहेत.

डिलिव्हरी बॉईजचे आव्हानात्मक जीवन..

डिलिव्हरी बॉईजचे अनेक व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. या कामगारांचे आव्हानात्मक जीवन कोणापासून लपलेले नाही. दररोज डिलिव्हरी देऊन रोजंदारी कमावणे असे त्यांचे काम आहे, ते एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये स्वतंत्रपणे काम करू शकतात. पण त्या बदल्यात त्यांना मिळणाऱ्या पेमेंटबाबत अनेकदा वाद होताना दिसतात. एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये तो दिवाळीच्या दिवशी 6 तास डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो, ज्यासाठी त्याला फक्त 317 रुपये मिळतात. या व्हिडिओने इंटरनेटवरील यूजर्समध्ये पुन्हा जुना वाद सुरू झाला आहे. लोक म्हणतात की, सणांसारख्या विशेष दिवसांमध्ये कंपन्यांनी त्यांच्या डिलिव्हरी एजंटसाठी काहीतरी खास विचार करायला हवा..

डिलिव्हरी एजंटची 6 तासांची कमाई पाहून व्हाल आश्चर्यचकित

डिलिव्हरी बॉयच्या या व्हिडीओमध्ये, ती व्यक्ती 6 तासांत एकूण 8 ऑर्डर डिलिव्हर करते, ज्याचे त्याला एकूण 317 रुपयेच मिळतात. त्याने पहिल्या ऑर्डरवर 40 रुपये, दुसऱ्या ऑर्डरवर 20 रुपये, तिसऱ्या ऑर्डरवर 50 रुपये, चौथ्या ऑर्डरवर 34 रुपये, पाचव्या ऑर्डरवर 24 रुपये, सहाव्या ऑर्डरवर 70 रुपये, सातव्या ऑर्डरवर 42 रुपये कमावले. आणि आठव्या ऑर्डरवर 32 रु. प्रत्येक ऑर्डर डिलीव्हर केल्यानंतर, व्यक्ती थंब्स अप दर्शवते आणि पुढील ऑर्डरची प्रतीक्षा करते. क्लिपच्या अगदी सुरुवातीला, डिलिव्हरी बॉय दाखवतो की तो संध्याकाळी 5 ते 11 या वेळेत कामावर जात आहे. त्याच्या या 47 सेकंदाच्या क्लिपला इंटरनेटवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritik tomar (@ritiktomar767)

दिवाळी सर्वांसाठी सारखीच नसते...

या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत, यूजर्सनी डिलिव्हरी बॉयबद्दल सहानुभूती दाखवत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, दिवाळीच्या दिवशी मी माझ्या बाल्कनीत उभा होतो, याच दरम्यान एक डिलिव्हरी एजंट सायकलवर आला आणि ऑर्डर दिल्यानंतर शेजारच्या घरात गेला. प्रत्येकजण उत्सवात मग्न असताना, पोट भरण्यासाठी रात्रभर धावणारा कोणीतरी आहे. असे तो म्हणाला. आणखी एका युजरने म्हटले की, माणूस आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी काहीही करू शकतो. तुम्ही केलेल्या कामाला सलाम. तिसऱ्या यूजरने लिहिले की, डिलिव्हरी ॲप कंपन्यांनी त्यांच्या एजंटना दिलेली रक्कम वाढवावी. चौथ्या यूजरने लिहिले की, "दिवाळी सर्वांसाठी सारखी नसते"

दिवाळीत झोमॅटोची नोकरी, 55 लाखांहून अधिक व्ह्यूज

इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट करताना सोशल मीडिया एन्फ्लुएंसर @ritiktomar767 ने लिहिले – दिवाळीत झोमॅटोची नोकरी. आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर रीलला 55 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्सबद्दल बोलायचे झाले तर हजाराहून अधिक लोकांनी पोस्टवर कमेंट केल्या आहेत. 

 

>>>

Viral: लग्नात क्षणात गायब होणारी ती 'मिस्ट्री वूमन' कोण? वऱ्हाडी मंडळीही आश्चर्यचकित! लोक म्हणाले- 'ही तर देवी...?'

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.