Arjun Kapoor On His Depression: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण (Ajay Devgan), अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंग (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात अर्जुनने खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण आता अर्जुन त्याच्या वैयक्तिक आजारामुळेही चर्चेत आलाय. कारण अर्जुनने नुकतच त्याच्या प्रकृतीविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
अर्जुनने तो सध्या डिप्रेशनमध्ये असून हाशिमोटो नावाच्या आजाराशी झुंज देत असल्याचं सांगितलं आहे. अनुपम चोप्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुनने हा खुलासा केला आहे. त्यामुळे तो सध्या या आजारावर उपचारही घेत असल्याची माहिती अर्जुनने दिली आहे.
अर्जुनने त्याच्या फ्लॉप सिनेमांविषयी बोलताना म्हटलं की, मी थेरपी घ्यायला सुरुवात केली होती. डिप्रेशन आणि त्यावर थेरपीची प्रक्रिया मागच्या वर्षापासून सुरु झाली आहे. मला नाही माहित नाही मी डिप्रेशनमध्ये आहे की नाही. पण मला हे माहितेय की मी काहीही काम करत नाहीये. माझं आयुष्य फिल्मी झालं होतं आणि आता अचानक मला इतर लोकांचं काम पाहण्याची सवय झाली आहे आणि मनात विचार आहे की, मी ते करू शकेन का, मला ती संधी मिळेल का?
अर्जुन कपूर पुढे म्हणाला की, मी कधीही कडवट किंवा नकारात्मक व्यक्ती नव्हतो, पण हे माझ्या आत खूप वाईट रीतीने पुढे सरकतंय.मी थेरपी सुरू केली आणि काही थेरपिस्टकडे गेलो, ज्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे मी पुन्हा गोंधळलो. त्यावेळी मला डिप्रेशनचं निदान झालं. मी याबद्दल नेहमी उघडपणे बोलत नाही, परंतु मला हाशिमोटो रोग देखील आहे, जो थायरॉईडचाच एक भाग आहे. आता सध्या माझी स्थिती ही एकतर फ्लाईट मोड किंवा फाईट मोड अशी आहे. मला हा आजार मी 30 वर्षांचा असताना झाला आहे.