डॉ.शशिकांत खेडेकर हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे.मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाने, मुस्लिम वस्त्यांमधील पायाभूत सुविधा, अंतर्गत रस्ते यासह विविध कामांसाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विद्यमान आमदारांचा केवळ मुस्लिम मतांवर डोळा आहे, मात्र मुस्लिम समाजाचे त्यांना काही देणे घेणे नाही.त्यामुळे कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा हे मुस्लिम बांधवांना आता समजले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम समाज बांधव डॉ.शशिकांत खेडेकर यांना भरभरून मतदान करतील असा विश्वासही सिद्दीक कृरेशी यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.मतदारसंघातील तमाम जनतेने, सर्व जाती धर्माच्या समाजबांधवांनी विकासपुरुष डॉ.शशिकांत खेडेकर यांनाच मतदान करावे असे आवाहनही सिद्धिक कुरेशी यांनी केले आहे..