महाविकास आघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, तर महाराष्ट्राला कसा चालणार? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
आफताब शेख, एबीपी माझा November 08, 2024 06:43 PM

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : तुमच्याच महाविकास आघाडीला तुमचा चेहरा चालत नाही. तर महाराष्ट्राला तुमचा चेहरा कसा चालेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला. बार्शी इथं महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. 2019 ला तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघात केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता सत्तेसाठी तुम्ही दिल्लीच्या दारोदारी फिरत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

राजेंद्र राऊत हा राजा माणूस 

मी जनतारुपी भगवंत महाराजांचे दर्शन घ्यायला आलो आहे. राजेंद्र राऊत हा राजा माणूस आहे. राजेंद्र राऊत यांच्या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. राजेंद्र राऊत यांच्या हातात धनुष्यबाण शोभून दिसतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही लोक म्हणतात, आमचा धनुष्यबाण चोराला, धनुष्यबाण चोरायला काय खेळणी आहे का? ह्या एकनाथ शिंदेने धनुष्यबाण वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री  म्हणाले. त्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है 

आम्ही सांगतील आहे, की लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद करणार नाही. आम्ही देणारे आहोत आणि सांगेल तेच करत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 1500 रुपयावरुन आम्ही 2100र रुपये करत आहोत. ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असे मुख्यमंत्री म्हणाले. युवकांसाठी 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महायुतीच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाईट बिलात 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

विरोधी उमेदवारने जंग जंग पछाडलं तरी राजेंद्र राऊत निवडून येणार 

महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, ते आता म्हणतात की 3000 रुपये देणार. आमच्या योजनेची चोरी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील बळीराजाचा पहिला अधिकार आहे. राजेंद्र राऊत यांची तुमच्यावर काय जादू आहे ते कळत नाही, त्यांचं नाव घेतलं की करंट येतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. विरोधी उमेदवारने जंग जंग पछाडलं तरी राजेंद्र राऊत निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्यांनी सोलापूर जनता बँक लुटली त्यांना तुम्ही निवडून देणार का? सोपाल यांच्यावर विविध संस्था लुटण्याचा आरोप, कलम 420 लागणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का?  महाविकास आघाडीच्या काळात बार्शीला भोपळा मिळाला. पण महायुतीचं सरकार आल्यानंतर बार्शीला 4000 कोटी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांसाठी हे सरकार हात आकडता घेणार नाही. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैराग तालुक्याची देखील घोषणा केली. वैराग तालुका नंबर एकचा असणार आहे असे ते म्हणाले. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.