पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
अंकिता खाणे November 08, 2024 07:13 PM

Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या. या निवडणुकीत जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला, तर मावळमधून भाजपचे बाळा भेगडे यांनाही पराभव स्वीकारावा लागला. जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने कमबॅक केलं आहे.

पुणे जिल्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गोष्टींनी महत्त्वाचा आहे. तसाच पुण्याला (Pune Vidhan Sabha Election 2024) राजकीय वारसा देखील खूप मोठा आहे. पुण्यातील नेते हे खासदारांपासून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत आपल्याला दिसतात. अशाच या पुण्यात  विधानसभेच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर राज्यात निवडणुकीच्या उमेदवारांचं आणि लढतींचं चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी महाआघाडी (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) यांच्यासह महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना-उद्धव, राष्ट्रवादी-शरद पवार) यांनी उमेदवारांना शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवले होते. 

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होतील. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रात एकूण 4 हजार 140 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत.

पुण्यातील राजकीय वर्चस्वाबाबत बोलायचं झालं तर पुणे लोकसभा (Pune Vidhan Sabha Election 2024) मतदार संघात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात सहाही विधानसभा मतदार संघात भाजपची बऱ्यापैकी पकड आहे. जिल्ह्याबाबतचे चित्र जरा वेगळे आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (पक्षफुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत) 10 आमदार आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे 8 आहेत, तर काँग्रेसचे 3 आमदार आहेत.

21 पैकी कोणाचे किती आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 10
भाजप - 8
काँग्रेस - 3 

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 जुन्नर विधानसभा मतदारसंघ  अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
2 आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ  दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
3 खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ  दिलीप मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) बाबा काळे (शिवसेना ठाकरे गट)    
4 शिरुर विधानसभा मतदारसंघ  ज्ञानेश्वर (माऊली) कटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
5 दौंड विधानसभा मतदारसंघ  राहुल कुल (भाजप)  रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
6 पुरंदर विधानसभा मतदारसंघ  विजय शिवतारे (शिवसेना) संजय जगताप (काँग्रेस) संभाजी झेंडे (अपक्ष)  
7 बारामती विधानसभा मतदारसंघ  अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) युगेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
8 इंदापूर विधानसभा मतदारसंघ  दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) प्रवीण माने (अपक्ष)  
9 भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ  शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) संग्राम थोपटे (काँग्रेस)    
10 मावळ मुळशी विधानसभा मतदारसंघ सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)   बापूसाहेब भेगडे (अपक्ष)  
11 चिंचवड मुळशी विधानसभा मतदारसंघ शंकर जगताप (भाजप) राहुल कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
12 पिंपरी मुळशी विधानसभा मतदारसंघ अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
13 भोसरी मुळशी विधानसभा मतदारसंघ महेश लांडगे (भाजप)  अजित गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
14 खडकवासला विधानसभा मतदारसंघ भीमराव तापकीर (भाजप) सचिन दोडके(राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) मयुरेश वांजळे (मनसे)  
15 वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ सुनील टिंगरे  (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)    
16 हडपसर विधानसभा मतदारसंघ चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) साईनाथ बाबर (मनसे)  
17 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ सुनील कांबळे (भाजप) रमेश बागवे (काँग्रेस)     
18 शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ सिद्धार्थ शिरोळे (भाजप) दत्ता बहिरट (काँग्रेस) मनिष आंनद (अपक्ष)  
19 कोथरूड विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील(भाजप) चंद्रकांत मोकाटे(शिवसेना ठाकरे) किशोर शिंदे (मनसे)  
20 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हेमंत रासने (भाजप) रवींद्र धंगेकर (काँग्रेस) कमलताई व्यवहारे (अपक्ष)  
21 पर्वती विधानसभा मतदारसंघ माधुरी मिसाळ (भाजप) अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)  आबा बागुल (अपक्ष)  
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.