Maharashtra Assembly election 2024: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ईडीच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या '२०२४: द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया' या पुस्तकातून करण्यात आलेला आहे.
यावर खुलासा करताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी सगळे गेले हा आरोप आमच्यावर होतच आहे. माझ्याबद्दल म्हणाल तर मला कोर्टाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लिन चीट दिलेली आहे. त्यामुळे मला ईडीची भीती होती, काही अडचण होती या गोष्टींचा मी इन्कार करत आहे.
''आम्ही खरंतर विकासासाठी भाजपसोबत आलेलो आहोत. ५४ लोकांनी सह्या केल्या होत्या, त्यांच्यावर काय ईडीची केस नव्हती. पण इथे आल्यानंतर आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास करु शकलो. माझ्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामं सुरु आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला होता, त्याचा आम्हाला फायदा झाला आणि होतो आहे.''
भुजबळ पुढे म्हणाले की, हे जे पुस्तक आहे, ते मी वाचलेलं नाही. सध्या मी निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे निवडणुकीनंतर वकिलांशी बोलून यावर निश्चित कारवाई करेन. जे चुकीचं होतंय ते सहन केलं जाणार नाही. मी ते पुस्तक वाचणार असून माझ्या वकिलांनाही देणार आहे. नको त्या गोष्टी माझ्या तोंडी दिलेल्या आहेत, त्याचा उहापोह होईल.
पुस्तकातील दावेछगन भुजबळ यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुनर्जन्म झाल्याचं म्हटलं
मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या
मी उच्च जातीचा असतो तर त्यांनी मला असे वागवले नसते
अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरु केली होती
साखर कारखान्यांच्या विक्रीवरुन त्यांना घेरण्यात आलेले होते
सुनेत्रा पवार यांचेही कारखान्यात भागभांडवल होते, त्यामुळे त्यांना अटक झाली असती