Aditya Thackeray On Narayan Rane: उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. ते शुक्रवारी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, नारायण राणेंच्या या खरमरीत टीकेला माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. असे घाणेरडे विचार अशाच घाणेरड्या व्यक्तींना येवू शकतात. मात्र हा प्रकार निंदनीय आहे. उघडपणे उध्दव साहेबांना धमकी देणे यातून त्यांचा हेतू आणि मनात विष आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आलाय. या घाणीवर आम्ही कधी बोलत नाही. पण गेले वीस वर्षे यांना पगार मिळायचा आमच्यावर टीका करायला, आम्हाला शिव्या द्यायला. उध्दव साहेबांना गोळ्या घालू हे बोलणे निंदनीय आहे. एका जबाबदार नेत्याने असे बेजबाबदारपणे बोलावे? एवढे घाणेरडे वक्तव्य आम्ही कधी ऐकले नाही. हा भाजपचा खरा चेहरा आहे. अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
अनेक पक्षातील लोक इडीच्या धाकाने भाजपमध्ये गेले आहेत. हे तर मी पहिल्यापासून बोलतोय. एकनाथ शिंदे पण तिकडे त्याच धाकाने गेले आहे. त्यांना जेलमध्ये जायचे नव्हते, म्हणून ते तिकडे गेले. त्यामुळे मी भुजबळ साहेबांचे कौतुक करतो ते स्पष्टपणे तरी बोलले. आज वेळ आली आहे, स्पष्ट बोलण्याची. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. शिव्या देतात. महाराष्ट्रात शिवसेनेचा एखादा कार्यकर्ता नावारुपाला येत असेल तर त्याला सोडून लावण्याचा आणि कमजोर करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. नारायण राणे, छगन भुजबळ असे अनेक नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता म्हणतोय की पुन्हा मला मुख्यमंत्री करा. कोण देईल सत्ता यांना?, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला.
हे ही वाचा