पिंपरी - ‘सकाळ’ पिंपरी कार्यालयाच्या ३२व्या वर्धापनदिनानिमित्त १० नोव्हेंबर रोजी गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडीतील रागा पॅलेस येथे होणाऱ्या ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ऑस्टिन रिॲलिटी हे आहेत. या मैफिलीनिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना राहुल देशपांडे यांच्या गायनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने नेहमीच पिंपरी-चिंचवडकरांसाठी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिवाळी, कार्तिकी वारी, सकाळ पिंपरी कार्यालय वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरवासीयांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा दिला जातो. हीच परंपरा कायम ठेवत ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ मैफीलीचे आयोजन करण्यात आले आहे.
काय असेल मैफिलीत?...
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीच्या बळावर राहुल देशपांडे यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपले आजोबा व प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांच्याकडून मिळालेला संगीताचा वारसा, त्यांची शास्त्रीय संगीतासह सुगम संगीत आणि नाट्यगीतांवरील पकड यामुळे त्यांच्या सादरीकरणाला रसिक नेहमीच दाद देतात. ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या मैफलीतही आपल्या गायनाचा असाच वेगळा नजराणा पेश करणार आहेत. हिंदी चित्रपटगीते तसेच शास्त्रीय संगीतातील त्यांच्या यु ट्यूब चॅनेलवरील निवडक गीतांचे सादरीकरण या मैफिलीत होईल.
राहुल देशपांडे हे आघाडीचे शास्त्रीय गायक आहेत. शास्त्रीय संगीतासोबत नाट्य संगीत, गझल, ठुमरी, चित्रपट संगीत आदी विविध गायन प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. ते शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करतात. त्यांच्यामुळे शास्त्रीय संगीताची युवा पिढीला आवड निर्माण झाली आहे.
- पं. सुधाकर चव्हाण, सचिव, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय व अध्यक्ष, कलाश्री संगीत मंडळ जुनी सांगवी
काय? कधी? केव्हा? कुठे?
काय? : ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’
कधी? : रविवार, १० नोव्हेंबर २०२४
केव्हा? : सायंकाळी ६ वाजता
कुठे? : रागा पॅलेस, काळेवाडी, मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ
अधिक माहितीसाठी संपर्क
शिवम : ९३०७७१५९०३
तिकीट विक्री सुरू
‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ मैफिलीची तिकीट विक्री सुरू झाली आहे. तिकिटे bookmyshow, ticketkhidkee.com तसेच प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे स. ९ ते ११.३० व सायं. ५ ते ८ उपलब्ध आहेत. तसेच, या बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही तिकिटे आरक्षित करता येणार आहेत.