Suryakumar Yadav PC Before IND vs SA 1st T20: भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून (८ नोव्हेंबर) सुरूवात होत आहे. बांगलादेशविरूद्धच्या ३-० अशा एकतर्फी विजयानंतर भारतीय संघ सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना खेळत आहे. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत आजच्या सामन्यातील कर्णधार पदाच्या जबाबदारी बद्दल प्रश्न विचारला असता, मी रोहित शर्माला पाहून नेतृत्व करायला शिकलो, असे सुर्याने सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना सुर्या म्हणाला," मी रोहित शर्माकडून खुप गोष्टी शिकल्या आहेत. मी त्याच्यासोबत फ्रॅंचाझी क्रिकेट खेळलो आहे. नुकतेच मी त्याला मोठ्या स्पर्धांमध्ये आणि द्विदेशीय मालिकांमध्येही नेतृत्व करताना पाहिले आहे. त्यामुळे मला माहित आहे, तो कशाप्रकरे संघातील खेळाडूंना वागणूक देतो. तो एक यशस्वी कर्णधार आहे. म्हणून मी त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टींना मी माझ्या मेहनतीची जोड देतो आणि सामन्यात नेतृत्व करतो."
भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यावर पावसाचे सावट आहे, असा अंदाज वर्तवला जात होता. पण, पावसाने अनुपस्थिती दाखवली आणि सामन्याला सुरूवात झाली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारत प्रथम फलंदाजीसाठी आला आणि सुरवातीपासून फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार भारताने ११ षटकांमध्ये २ बाद १११ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये संजू सॅमसन ७० धावांवर खेळत आहे. तर तिलक वर्मा ८ धावांवर नाबाद आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):रियान रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), त्रिस्तान स्तब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को यानसेन, एंडिले सिमेलन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, एनकाबा पीटर.
भारतीय (प्लेइंग इलेव्हन):अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (क), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान
टी२० मालिकेचे वेळापत्रक (दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत)८ नोव्हेंबर - पहिला टी२० सामना, डर्बन (वेळ - रा. ८.३० वाजता)
१० नोव्हेंबर - दुसरा टी२० सामना, गकेबेहरा (वेळ - रा. ७.३० वाजता)
१३ नोव्हेंबर - तिसरा टी२० सामना, सेंच्युरियन (वेळ - रा. ८.३० वाजता)
१५ नोव्हेंबर - चौथा टी२० सामना, जोहान्सबर्ग (वेळ - रा. ८.३० वाजता)