सोलापुरात काँग्रेसला हादरा! 5 माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
आफताब शेख, एबीपी माझा November 10, 2024 12:13 AM

Solapur Congress News : सोलापुरात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. सोलापूर मध्य मध्ये मोची समाजाला (Mochi Samaj) उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकसह पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, सिद्राम अट्टेलुर, वैष्णवी करगुळे, सरस्वती कासलोलकर, जेम्स जंगम या माजी नगरसेवकसह युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे, उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची होती. मात्र, मोची समाजाला उमेदवारी न देता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

भाजपकडून सोलापूर मध्यमध्ये देवेंद्र कोठे मैदानात

सोलापूर मध्यच्या जागेवरुन मोठं वादंग निर्माण झालं आहे. या जागेवर मोची समाजाचा उमेदवार द्यावा असी मागमी केली होती. तसेच हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून माकपला सोडण्यात येणार होता. मात्र काँग्रेसने शहराध्यक्ष चेनत नरोटेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं हा मतदारसंघ माकपलाही नाही आणि मोची समाजाच्या उमेदवारालाही नाही. त्यामुळं नाराज झालेल्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरात आता चौरंगी लढत होत आहे. भाजपकडून देवेंद्र कोठे मैदानात उतरले आहेत. तर MIM कडून फारुख शाब्दि तर CPM कडून नरसय्या आडम हे मैदानात उतरल आहेत. तर काँग्रेसकडून चेतन नरोटे  यांन संधी देण्यात आली आहे. त्यामुळं आता या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

विधानसबा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात अंत्यंत चुरस

लोकसभा निवडणुकानंतर सोलापूर जिल्ह्यात अंत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, भाजपच्या दोन्ही विद्यमान खासदारांचा पराभव करत महाविकास आघाडीने जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मोठी रंगत आली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.