दौंड शहरात पोलिसांकडून पथसंचलन
esakal November 10, 2024 12:45 AM

दौंड, ता. ८ : दौंड शहरात पोलिस आणि निमलष्करी दलाच्या तुकडीकडून पथसंचलन करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक सशस्त्र तुकडी या पथसंचलनात सहभागी झाली होती.

दौंड विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आणि निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी, याकरिता दौंड शहरात पथसंचलन करण्यात आले. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलिस ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज चौक - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - महात्मा गांधी चौक - श्री विठ्ठल मंदिराची मागील बाजू - शाही आलमगीर मशीद - गाव वेस - कुंभार गल्ली - पंडित नेहरू चौक - धर्मवीर संभाजी स्तंभ - श्री सिंधी धर्मशाळा मार्गे दौंड पोलिस ठाणे असे पथसंचलन करण्यात आले.

त्यानंतर दौंड पोलिस ठाण्यापासून हुतात्मा चौक - कुरकुंभ मोरी - शालीमार चौक - राजमाता अहल्यादेवी होळकर सहकार चौक - गोकूळ हॅाटेल - महालक्ष्मी हॉस्पिटल मार्गे दौंड - गोपाळवाडी रस्त्यावरील सरपंच वस्ती या शहराच्या विस्तारित भागात पथसंचलन केले. या पथसंचलनात दौंडचे पोलिस निरीक्षक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे निरीक्षक संजीव कुमार, दोन सहायक पोलिस निरीक्षक, पाच फौजदार, पंचवीस पुरुष व पाच महिला पोलिस अंमलदार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० सशस्त्र जवान आणि पंधरा माजी सैनिकांचा समावेश होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.