ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहचला आहे.
Gautam Gambhir पत्रकार परिषदऑस्ट्रेलिया जाण्यापूर्वी भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मुंबईत पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यावेळी त्याने अनेक मुद्यांवर भाष्य केलं.
Shardul Thakur शार्दुल ठाकूरची निवड नाहीया दौऱ्यासाठी मुंबईकर अष्टपैलू शार्दुल ठाकूरची भारतीय संघात निवड झालेली नाही.
Shardul Thakur दरवाजे बंद?मुंबईकर अष्टपैलू शार्दुल ठाकूरसाठी सध्या तरी कसोटी क्रिकेटसाठी दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Shardul Thakur पुढचा विचारआम्ही आता शार्दुलच्या पुढचा विचार करत आहोत, असे गंभीरने सांगितले. वेगवान गोलंदाज अष्टपैलू नितीशकुमार रेड्डीवर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने भरवसा दाखवला आहे.
Gautam Gambhir सर्वोत्तम संघ - गंभीरऑस्ट्रेलियातील या मालिकेसाठी सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडला आहे, असे गंभीर म्हणाला. यावरून सध्या तरी शार्दुलचा विचार होणार नाही, हे निश्चित होत आहे.
Shardul Thakur महत्त्वाचा वाटागॅबा कसोटीत भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात शार्दुल ठाकूरचा वाटा मोलाचा राहिलेला आहे. निर्णायक क्षणी त्याने विकेट मिळवताना अर्धशतकही केले होते.
Nitish Kumar Reddy नितीश कुमारवर विश्वासनितीशकुमारकडे चांगली गुणवत्ता आहे. त्याच्या रूपाने आम्हाला चांगला पर्याय मिळाला आहे. संघी मिळाल्यावर तो आपली उपयुक्तता दाखवून देईल, असे नितीशकुमारच्या निवडीबाबत बोलताना गंभीर म्हणाले.
Rohit Sharma ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत 'हा' खेळाडू करणार कॅप्टन्सी!