500 रुपयांत सिलिंडर ते 100 यूनिट मोफत वीज, मविआच्या जाहीरनाम्यातील 10 मोठी आश्वासनं!
प्रज्वल ढगे November 10, 2024 03:43 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात माहविकास आघाडीने महिला, शेतकरी, तरुण यासाठी आकर्षक घोषणा केल्या. या जाहीनामा प्रसिद्धीच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनं जाणून घेऊ या...

मविआच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे? 

सत्तेत आल्यास आम्ही महिलांना बसचा प्रवास मोफत करू

महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार

जातीआधारित जनगणना करणार 

महिलांना प्रत्येक वर्षाला 6 गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना देणार

महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करू

300 यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरांना 100 यूनिटपर्यंत मोफत वीज

न्यू इंडिस्ट्रियल पॉलीस तयार करू, यातून रोजगारनिर्मिती, कामगारांचे कल्याण करू

 2.5 लाख रिक्त जागा भरण्यासाठी एमपीएससी परीक्षा प्रक्रिया चालू करू 

चौत्यभूमी, दादर, इंदूमील येथे स्मारक बांधण्याची तत्काळ सुरूवात करण्यात येईल. 

एमपीएससीचा 45 दिवसात रिझल्ट लावणार

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 2100 ते शेतकरी कर्जमाफी, भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस, जाणून घ्या 5 वर्षांत काय करणार?

BJP Maharashtra: भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना

Mahavikas Aghadi Manifesto: प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.