Hardik Natasha divorce: भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टनेकोविन यांनी जुलै 2024 मध्ये आपल्या घटस्फोटाची घोषणा करत चार वर्षांपासून एकत्र असलेल्या या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगाही आहे. या घोषणेनंतर काही दिवसांनी नताशा सर्बियाला गेली होती. त्यामुळे ती सर्बीयाला अगस्त्यला घेऊन गेली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु हेाती. या चर्चांना आता नताशानंच ब्रेक दिला आहे. ईटाइम्सला सांगताना नताशा म्हणाली की मी कशी निघून जाणार. मला एक मुलगा आहे. तो शाळेत जातो. हार्दिक पण फॅमिलीच आहे. मी दरवर्षी याच सुमारास सर्बियाला जाते.
नताशाला सर्बियाला जाण्याविषयी विचारले असता ती म्हणाली, शहरात चर्चा आहे की मी वापस निघून गेले. पण मी कशी जाईन. मला एक मुलगा आहे. तो शाळेत जातो. मी निघून जाण्याची शक्यताच नाही. माझ्या मुलालाही इथे राहण्याची आवश्यकता आहे. तो इथेच आहे. कुटुंब इथे आहे. मी आणि हार्दिकही फॅमिलीच आहोत. आमचं मुल आहे. ते आम्हाला एकत्र बांधून ठेवतं. अगस्त्यसोबत दोन्ही म्हणजे आई आणि वडिलांनी राहणं आवश्यक आहे. जवळपास १० वर्षांपासून दरवर्षी मी याच काळात सर्बियाला जाते.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक या दोघांनी लग्नानंतर चार वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोघांनीही मुलाला एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकसोबत घटस्फोटाचं कारण सांगण्यासाठी दोघांनाही बोलायचं नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यांना हा विषय खाजगीच असावा असे वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं होते. दरम्यान, मुलगा अगस्त्यला हार्दिक आणि नताशा एकत्र सांभाळणार असल्याचं नताशानं सांगितलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी त्याच्यासोबत वेळ घालवत त्याला काही गिफ्ट घेऊन दिले होते. त्यावेळी नताशानं केलेले वक्तव्य चर्चेत होते.
हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले होते. दोघांनी त्याच वर्षी 30 जुलै रोजी मुलाला जन्म दिला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी हार्दिक आणि नताशाने फेब्रुवारी 2023 मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमधील डेस्टिनेशन वेडिंगमध्ये या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींची पुनरावृत्ती केली. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी रोजी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नाचे विधी पार पडले होते. एका दिवसानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते.