मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली जात आहे. अशातच उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेले असून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याची टीकाही त्यांच्यावर केली जात आहे. अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मौलाना यांनी आवाहन केलं आहे. इतकंच नाहीतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिर मौलानांसोबत बसलेले दिसले. मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील प्रभू यांना मतदान करण्याचे आवाहन मौलाना यांनी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दिंडोशीचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिर हे दोघे दिसत आहेत. दरम्यान, काल रात्रीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिंडोशी येथे झालेल्या प्रचारसभेतून शिवसेनेच्या उर्दू पत्रकावर आणि वर्सोवा विधानसभेत मुस्लिम उमेदवार उभे केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली होती.