प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या कामाच्या बदल्यात चांगला पगार मिळायला हवा विशेषत: जे लोक ऑफिसमध्ये काम करतात त्यांना. महिन्याच्या अखेरीला मिळणाऱ्या पगाराची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हा ‘सॅलरी’ शब्द नेमका आला कुठून ? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या शब्दाची उत्पत्ती खरंतर मिठापासून झाली आहे. जाणून घेऊयात मीठ हा शब्द आणि याचा अनोखा इतिहास काय आहे याबद्दल.
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मीठ हे आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे प्राचीन रोममध्ये मिठाचे महत्त्व केवळ जेवणापुरतेच मर्यादित नव्हते. त्यावेळी मिठाला एक अमूल्य वस्तू समजले जात होते. आणि त्याचा वापर संपत्तीच्या स्वरुपात केला जात होता. रोमन साम्राज्यात सैनिकांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात जे वेतन दिले जात होते. त्याला ‘सॅलेरियम’ म्हटले जात होते. महत्त्वाची गोष्ट अशी की पगार हा सोन्या-चांदीच्या नाण्यांच्या रुपात नव्हे तर मिठाच्या स्वरुपात दिला जात होता. याच ‘सॅलेरियम’ शब्दाला आपण आजकाल ‘सॅलरी’ हा शब्द वापरतो.
मीठ ही इतकी गरजेची गोष्ट होण्यामागे अनेक कारणं होती. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मीठ हे खाद्यपदार्थांना भरपूर वेळासाठी सुरक्षित ठेवण्यात मदत करते. दुसरं म्हणजे शरीरातील आवश्यक खनिजांचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून याकडे पाहिले जात होते. तिसरं म्हणजे प्राचीन काळात मीठ सहजासहजी उपलब्ध होत नव्हतं. मीठ मिळवण्यासाठी दूरदूरवर जावं लागायचं आणि म्हणूनच मिठाची किंमत खूप जास्त होती.
मिठाच्या या महत्त्वामुळेच ‘मिठाचे कर्ज’ ही म्हण प्रचलित झाली. याचा अर्थ असा होतो की कोणाचे तरी आपल्यावर उपकार असणं. असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खूप उपकार कोणीतरी करते तेव्हा असं म्हटलं जातं की ती व्यक्ती आता ‘मिठाची कर्जदार’ झाली आहे.
रोमन इतिहासकार प्लीनी द एल्डरने त्याच्या ‘नॅचरल हिस्ट्री’मध्ये उल्लेख केला आहे की प्राचीन रोममध्ये सैनिकांना वेतनाच्या रुपामध्ये मीठ दिले जात होते. याच प्रथेमुळे ‘सॅलरी’ हा शब्द तयार झाला असं म्हटलं जातं. काही अभ्यासावरुन हेही समजलंय की ‘सॉल्डियर’ हा शब्द लॅटिन शब्द ‘ ‘सॅल डेरे’ पासून बनला आहे. ज्याचा अर्थ मीठ देणे असा होतो. रोमन भाषेत मिठाला ‘सॅलेरियम’ म्हटलं जातं. आणि या शब्दापासूनच ‘सॅलरी’ या शब्दाची उत्पत्ती झाली.
हिब्रूतील ‘एजरा’ या पुस्तकामध्ये 550 आणि 450 इसवी सन पूर्वबद्दल लिहिलं आहे की त्यावेळी मिठाची किंमत महाग होती. जर एखादी व्यक्ती कोणाकडून मीठ घेत असेल तर असं समजलं जात होतं की समोरच्या व्यक्तीने मीठ देऊन फार मोठे उपकार केले आहेत. जसे की त्याला पगारच दिला आहे. मिठाची किंमत इतकी जास्त होती की काही काळाआधी मिठावर केवळ राजाचाच अधिकार असायचा. याच पुस्तकात एक प्रसिद्ध फार्सी राजा, आर्टाजक्सीर्स पहिला याच्याविषयी सांगण्यात आले आहे की त्याचे नोकर सांगायचे त्यांना राजाकडून मीठ मिळायचं यासाठीच ते राजाशी खूप प्रामाणिकपणे वागायचे. आजही आपण एखाद्याशी प्रामाणिक राहण्याबद्दल बोलत असू तर आपण असं म्हणतो की मी त्यांचं मीठ खाल्लंय. यावरुनच हे सिद्ध होतं की मीठ हे केवळ खाण्याकरता नाही तर नात्यांमधील प्रामाणिकपणा दर्शवणारं हे प्रतीकदेखील होतं.
हेही वाचा : Bollywood Star : कंजूस आहेत हे बॉलीवूडचे सितारे
संपादन- तन्वी गुंडये