Most Watched Webseries 2024: या वर्षी 2024 मध्ये अनेक वेब सिरीज रिलीज झाल्या. यापैकी मोजक्याच मालिका आहेत ज्यावर प्रेक्षकांनी मनमोकळेपणाने प्रेमाचा वर्षाव केला. आता वर्षाचा शेवट आला तरी या वेबसिरिजचं नाव प्रेक्षकांच्या तोंडी आहे आणि या सिरिजचा ते आजही आनंद घेतायत. वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज झालेल्या या वेबसिरिज तुम्ही पाहिल्यात का?
सचिव आणि प्राचार्यला ओळखत नाही असे बोटावर मोजण्याएवढेच काही असतील. पहिले दोन भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर यावर्षी या वेबसिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ॲमेझॉन प्राईमची ही वेबसिरिज प्रेक्षकांनी तुफान पाहिली. यातले प्रधानजी, प्रल्हाद काका, सेक्रेटरीजी यांची धमाल, रिंकी आणि सेक्रेटरीची केमिस्ट्री आणि बनारकस आणि बिनोद यांची जुगलबंदी हीट ठरली. आतापर्यंत या वेबसिरिजला 28.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. जर तुम्ही या वेबसिरिजचा तिसरा सिझन पाहिला नसेल तर ॲमेझॉन प्राईमवर पाहता येईल.
हीट वेबसिरिजच्या यादीत दुसरं नाव आहे बिब्बो जान, फरिदन आपा यांच्या हिरामंडी या वेबसिरिजची. संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी वेबसिरिज प्रेक्षकांनी फार मन लावून पाहिली. सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, शर्मीन सेगल, प्रतिभा रंता यांच्यासह अनेक स्टार्स या मालिकेत दिसले आहेत. त्याला नेटफ्लिक्सवर 20.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
सिध्दार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टीची ॲक्शन असणारी इंडियन पोलिस फोर्स ही थ्रिलर वेबसिरिज यंदाच्या हीट वेबसिरिजपैकी एक आहे. या वेबसिरिजला आतापर्यंत १९.५ मिलियन व्ह्यूज मिळालेत.
जितेंद्र कुमारची लोकप्रिय मालिका 'कोटा फॅक्टरी सीझन 3' तुम्हाला कोटा आणि तिथे शिकणाऱ्या मुलांचा संघर्ष दाखवते. या मालिकेचा तिसरा सीझन यावर्षी रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. याचे पहिले दोन भागही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. इंजिनिअरिंगसाठी आयआयटीत जाण्याचा विद्यार्थ्यांच्या संघर्षाला हात घालणाऱ्या या वेबसिरिजला तरुण प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर आत्तापर्यंत या मालिकेला नेटफ्लिक्सवर 15.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलिज झालेली द लिजेंड ऑफ हनुमान सीझन 4 चे आतापर्यंत 5 सीझन आले आहेत. आणि सर्व सीझन प्रेक्षकांना खूप आवडले. या मालिकेच्या तिसऱ्या आणि सीझन 4 ला आतापर्यंत 14.8 व्ह्यू मिळाले आहेत.