हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या उभय संघांमध्ये 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. दोन्ही देशांमधील चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेसाठी विराट कोहली पर्थमध्ये दाखल होताच ऑस्ट्रेलिया मीडियामध्ये त्याचा जलवा पहायला मिळाला. ऑस्ट्रेलियामधील अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर किंग कोहलीचे फोटो हिंदी आणि पंजाबी भाषेतील हेडलाईनसह छापण्यात आले आहेत.
बहुप्रतीक्षित बॉर्डर गावसकर ट्रॉफीची चाहत्यांसह मीडियामध्ये सुद्धा जोरदार चर्चा आहे. पर्थमध्ये 22 नोव्हेंबर पासून दोन्ही देशांमध्ये द्वंद्वाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 10 दिवस आगोदरच विराट कोहली पर्थमध्ये दाखल झाला आहे. विराट कोहलीच्या येण्याचा आनंद ऑस्ट्रेलिया मीडियामध्ये दिसून आला. ऑस्ट्रेलियामधील अनेक वृत्तपत्रांमध्ये विराट कोहलीचा फोटो पहिल्या पानावर छापण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हिंदुस्थानी चाहत्यांना आकर्षीत करण्यासाठी फोटोचे हेडलाईन हिंदी आणि पंजाबी भाषेमध्ये छापण्यात आल्याचे पहायला मिळाले. एका हिंदुस्थानी चाहत्याने त्याच्या ट्वीटरवर (X) वृत्तपत्रांचे फोटो पोस्ट केले आहेत.
विराट कोहली व्यतिरिक्त टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालचा ‘The New King’ असा इंग्रजी तसेच पंजाबी भाषेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक ऋषभ पंत सुद्धा वृत्तपत्रांमध्ये झळकला आहे. विराट कोहली मागील काही दिवसांपासून खराब कामगिरीमुळे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळून असणार आहेत.