मोठी बातमी! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.27 किलो सोनं जप्त, दुबईवरुन आलेल्या प्रवाशाला अटक
Marathi November 13, 2024 10:24 AM

जप्त केलेले सोने: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Mumbai International Airport) एक मोठी बातमी समोर येत आहे. विमानतळावर 2.27 किलो सोनं जप्त (Gold Seized) केलं आहे. याप्रकरणी दुबईवरुन (Dubai) आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रत्येकी 1 किलो वजनाच्या 24 कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. ट्राउझरच्या खिशात सोन्याच्या विटा आणण्याचा प्रवाशाचा प्रयत्न होता. मात्र, कस्टम्स विभागानं कारवाई करत सोनं जप्त केलं आहे.

मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागानं मोठी कारवाई केली आहे. कस्ट विभागानं  2.27 किलो सोनं जप्त केलं आहेय याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असताना दिसत आहे. अशा घटना घडत असल्यामुळं पोलिस प्रश्नासन, कस्टम्स विभागाचे अधिकारी सतर्क आहेत.

सोन्याच्या तस्करीत का होतेय वाढ?

सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. अशा घटनांवर विविध विभाग लक्ष ठेऊन आहेत.

सध्या सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं परवडत नाही. त्यामुळं जे श्रीमंत लोक आहेत, ते मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक ही फायद्याची मानली जाते. कारण भविष्यकाळात सोन्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा मोठा कल असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भविष्यात देखील सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

अनेक देशातून भारतात सोन्याची तस्करी

गेल्या वर्षभरात अनेक देशातून भारतात सोन्याची तस्करी होताना दिसत आहे. दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबईदिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

वर्षभरात सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ, तब्बल 500 किलो सोनं केलं जप्त

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.