Maharashtra Assembly Elections 2024 : विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Elections 2024) खोट्या माहितीच्या पसरविल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हवर पोलीस आता करडी नजर ठेवणार आहेत. त्याचसाठी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) काही सोशल मीडिया अकाउंट्स सर्व्हेलन्सखालीही ठेवली आहेत. यापूर्वी ज्यांनी सोशल मीडियावर चिथावणी देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या, त्याचे सोशल मीडिया अकाऊंटही आता सर्व्हेलन्सखाली येणार आहेत. इतकच नही तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही पोलिसांची नजर असणार आहे. यासंदर्भात पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी माहिती दिली.
यासाठी व्हाट्सअॅप, युट्युब,फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या पाच माध्यमांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्सचाही वापर पोलिसांकडून केला जाणार आहे. पण व्हाट्सअॅप आणि टेलिग्रामवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ह्युमन इंटेलिजन्सचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे व्हाट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप्समध्ये पोलिसांची उपस्थिती असल्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत.
सध्या व्हाट्सअॅप, युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम या पाच माध्यमांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही लोक फेक पोस्ट आणि डीप फेक व्हिडिओज तयार करून वायरल करत आहे.प्रामुख्याने फेक नरेटिव्ह तयार करण्यासाठी याचा वापर केला जातोय. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात फेक नरेटिव्ह तयार करणे, पसरविणे गुन्हा असून शिक्षेस पात्र आहे.त्यामुळे नागपूर पोलिसांनी सर्व पोलीस स्थानकात सायबर पोलीस पथक तयार केल्याची माहिती उपयुक्त मतानी यांनी दिली आहे.
या पथकामध्ये एक अधिकारी, दोन कर्मचारी आणि काही गुप्त कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. हे पथक फेक पोस्ट किंवा जाती समूहाच्या विरोधात काही चुकीची माहिती प्रसारित केल्या जात असतील तर त्यावर नजर ठेवत आहे. खोटी सोशल मीडिया पोस्ट नजरेस पडताच हे विशेष पथक ते पोस्ट डिलीटही करत आहे. तसेच चुकीच्या पोस्ट करणाऱ्यांना शोधून त्यांच्या विरोधात कारवाई करत असल्याची माहिती ही उपायुक्त रोहित मतानी यांनी दिली.
Ajay Chaudhari : बाळा नांदगावकर राहतात कुठे आणि निवडणूक लढवतात कुठे? ठाकरे गटाच्या अजय चौधरींचा सवाल