काही जणांचे म्हणणे असते की, लग्न झाल्यावर डिप्रेशन येते तर काहीजण असे म्हणतात की, लग्न न झाल्याने आणि सिंगल राहिल्याने जास्त डिप्रेशन येते. त्यामुळे नुकतंच विवाहित आणि अविवाहित लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत एक संशोधन करण्यात आले आहे. यात विविध वयोगटातील लोकांचा समावेश करून त्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यात आला आहे. ज्यात कोणत्या नातेसंबधात राहिल्याने डिप्रेशनचा धोका जास्त निर्माण होतो हे समोर आले आहे. या संशोधनात नक्की काय समोर आले आहे, हे समजून त्याची कारणे पाहूयात,
या संशोधनानुसार, विवाहितांचे मानसिक आरोग्य स्थिर असून त्यांना स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी प्रमाणात असते. याउलट अविवाहितांचे मानसिक आरोग्य जास्त धोक्यात असते. खरं तर, अविवाहित राहिल्याने व्यक्तीमध्ये एकटेपणाची भावना जागृत होते, ज्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनची शक्यता वाढते. याउलट विवाहितांमध्ये पार्टरकडून मिळणारा पाठिंबा, प्रेम आणि सोबत यांमुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत होते आणि त्या एकमेकांचा आधार बनतात. परिणामी, मानसिक समस्यांचा धोका कमी होतो.
डॉक्टरांच्या मते, लग्न केवळ दोन व्यक्ती बंधनात अडकतात, इतकचं नाही तर त्यांना एकमेकांचा आधार मिळतो, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवे. अविवाहित व्यक्तींना आयुष्यात एकटेपणा जाणवतो. ज्यामुळे भविष्यात मानसिक समस्या उद्भवू शकतात. याउलट लग्न झालेल्या व्यक्ती कुटूंब आणि मुलांच्या सहवासात आनंदी राहतो.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे