टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा गेल्या काही टी 20I सामन्यांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता. अभिषेकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे अभिषेकला तिसर्या टी 20I सामन्यातून बाहेर करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव याने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवलं. अभिषेकने सूर्याचा विश्वास सार्थ ठरवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत अर्धशतक झळकावलं.
टीम इंडियाने दुसऱ्या बॉलवर पहिली विकेट गमावली. संजू सॅमसन झिरोवर आऊट झाला. त्यानंतर अभिषेक शर्माची साथ द्यायला तिलक वर्मा आला. या दोघांनी दोन्ही बाजूने जोरदार फटकेबाजी केली. अभिषेक शर्माने टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी केली. दोघांनीही पावर प्लेचा पूर्ण फायदा उचलला आणि 70 धावा जोडल्या. पावरप्लेनंतरही दोघांनी अशीच फटकेबाजी सुरु ठेवली.
अभिषेकने नवव्या ओव्हरमधील दुसर्या बॉलवर केशव महाराज याच्या बॉलवर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने 208.33 च्या स्ट्राईक रेटने 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले. याचाच अर्थ अभिषेकने 8 चेंडूत 52 धावा केल्या. मात्र अभिषेक 25 व्या बॉलवर आऊट झाला. मात्र अभिषेकचा या अर्धशतकी खेळीमुळे विश्वास वाढला असेल, हे मात्र नक्की.
अभिषेक शर्माची विस्फोटक बॅटिंग
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.