World Diabetes Day 2024: आज जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जात आहे. शरीराला योग्य ऊर्जा देण्यासाठी सकाळची वेळ ही उत्तम मानली जाते. खास करून मधुमेहाच्या रूग्णांनी सकाळी काही पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. सकाळी प्रथिने, कार्ब्स, हेल्दी फॅट्स, फायबर आणि स्टार्च नसलेले पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहींनी सकाली कोणत्या पदार्थांचे सेवन करणे उत्तम मानले जाते.
तूप आणि हळदी पावडरतुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू नये यासाठी सकाळी तूप आणि हळद पावजरचे सेवन करावे. यासाठी सर्वात आधी १ चमचा गाईचे तूप आणि हळद एकत्र करून कोमच पाण्यासोबत सेवन करावे.
दालचिनी पाणीदालचिनी हा एक मसाला आहे. जो शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप लाभदायी ठरतो. जर तुम्हाला साखरेची पातळी कमी करायची असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी प्यावे. याशिवाय दालचिनीचे सेवन हर्बल चहासोबत करता येते.
मोड आलेले मूगमधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार हा एक चांगला पर्याय मानला जातो. तुम्ही सकाळी नाश्त्यात मोड आलेले मूग खाऊ शकता. हे केवळ प्रथिनांचा एक चांगला स्रोत नाही तर ते साखरेची पातळी देखील मोठ्या प्रमाणात कमी करू शकते.
मेथी पाणीशरीरातील वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दालचिनीचे पाणी पिणे खूप आरोग्यदायी ठरू शकते. हे दिवसा कार्बोहायड्रेट शोषण कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे 1 चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर हे दाणे पाण्यासोबत चावून खा. याच्या मदतीने रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
लिंबू आणि आवळा रसमधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि आवळ्याचा रस पाण्यासोबत घ्यावा. हे एक अल्कधर्मी पेय आहे. जे तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारू शकते. यामुळे तुमची पचनक्रिया तर सुधारेलच पण तुमची साखरेची पातळीही बऱ्याच प्रमाणात राखली जाईल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.