Ramandeep Singhने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर रचला विक्रम! सुर्या नंतर ठरला दुसरा भारतीय
esakal November 15, 2024 02:45 AM
भारत-दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिकेतील तिसरा सामना भारताने ११ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-१ आघाडी घेतली.

Ramandeep singh पहिल्याच चेंडूवर षटकार

या सामन्यात रमणदीप सिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला व विक्रम रचला.

Ramandeep singh आतंरराष्ट्रीय ट्वेंटी-२०

आतंरराष्ट्रीय ट्वेंटी-२० पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच सामन्यात षटकार लगावणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.

Ramandeep singh सोहेल तन्वीर

२००७ मध्ये पाकिस्तानच्या सोहेल तन्वीर याने भारतीय संघाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.

Ramandeep singh जेरोम टेलर

वेस्ट इंडिजचा जेरोम टेलर २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता.

Ramandeep singh झेवियर मार्शल

कॅरेबियन क्रिकेटपटू झेवियर मार्शलने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अशी कामगिरी केली होती.

Ramandeep singh किरॉन पोलार्ड

किरॉन पोलार्डने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आंतरारष्ट्रीय ट्वेंटी-२० पदार्पण सामन्यात षटकार लगावला होता.

Ramandeep singh टिनो बेस्ट

वेस्ट इंडिजच्या टिनो बेस्ट याने २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात षटकाराने खाते उघडले होते.

Ramandeep singh मंगालिसो मोसेहले

दक्षिण आफ्रिकेच्या मंगालिसो मोसेहलेने देखील श्रीलंकेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करून यादीत ५ वे स्थान मिळवले.

Ramandeep singh सूर्यकुमार यादव

भारताचा ट्वेंटी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध अहमदाबादच्या मैदानात पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर अशी कामगिरी केली आणि पहिला भारतीय ठरला.

Ramandeep singh रमणदीप सिंग

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारत रमणदीप सिंग अशी कामगिरी करणारा जगातला आठवा व भारतातला दुसरा खेळाडू ठरला.

Ramandeep singh test captain ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेले भारतीय कर्णधार
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.