बेडरूमसाठी वास्तु टिप्स : वास्तुनुसार बेडरूम कसा बनवायचा
Marathi November 15, 2024 06:24 AM

वास्तूशास्त्रात घरात सुख-शांती नांदण्यासाठी घरातील वस्तू कुठे आणि कशा ठेवायच्या याबाबत काही नियम सांगितले आहे. या नियमाप्रमाणे घर ठेवले नाही तर घरातील सदस्यांसह घरावर याचा नकारात्मक परिणाम दिसू लागतो. घरातील बेडरूमबाबत वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. बेडरूममधील हे नियम पाळले गेले नाही तर पती पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो याशिवाय दोघांची प्रगती थांबू शकते. शास्त्रात सांगण्यात आलेल्या या नियमांमध्ये बेडरूमचा रंग, बेडरूमधील फर्निचर, बेड कुठे असाव्यात, हे सांगण्यात आले आहे.

भिंतीचा रंग –

बेडरूमसाठी डोळ्यांना आराम वाटेल असा रंग लावायला हवा. बेडरूममध्ये भडक रंग लावणे टाळायला हवेत. तुम्ही बेडरूमसाठी गुलाबी, पीच अशा रंगाना प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही हिरवा रंग सुद्धा निवडू शकता. हिरवा रंग घरात आनंदी वातावरण तयार करतो.

बेडरूमची सजावट –

बेडरूमची सजावट करताना बेडरूममध्ये शिरताच तुम्हाला फ्रेश वाटेल अशी सजावट करावी. यासाठी तुम्ही बेडरूमच्या उत्तर कोपऱ्यात रोपे लावू शकता. याने पती पत्नीमधील प्रेम वाढते. याव्यतिरीक्त राजहंसाच्या जोडीचे फोटो लावू शकता.

प्रकाश –

दिवसा बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ द्या. यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घरात जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येईल याची काळजी घ्यावी.

पलंग –

बेड हा बेडरूमच्या दक्षिण किंवा पश्चिम कोपऱ्यात असावा. या दिशा बेडसाठी योग्य मानले जाते. याशिवाय तुमचा बेड बेढब नसेल याची खात्री बाळगावी.

आरसे –

बेडरूममधील आरस्याबाबतीत वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत. बेडरूममध्ये बेडसमोर आरसे ठेवू नयेत, असतील तर झाकलेले असतील याची काळजी घ्यावी..

 

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.