छ्त्रपती संभाजीनगर : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी गेवराईमध्ये नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, संत सेवालाल महाराज सभागृह, स्मशानभूमीतील संरक्षक भिंत, रस्ते, दत्त मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक, नळकांडी पूल, महादेव मंदिरासाठी सिमेंट रोड अशी विकास कामे केल्याचे त्यांनी सांगितले.
संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ गेवराई येथे गावकऱ्यांच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. संजय शिरसाट म्हणाले की, गेवराईमध्ये अनेक विकास कामे केली, मी विकासचे राजकारण करतो, जातीपातीचे नाही. गेवराई पोलीस चौकीसाठी आपण प्रस्ताव दिला आहे.
जायकवाडीचे पाणी निवडून आल्यावर ४ महिन्यात आणू. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पवार, तालुकाप्रमुख सुमीत त्रिवेदी, उपशहरप्रमुख सतीश निकम, मोहित त्रिवेदी, ऋत्विक अग्रवाल, बंटी पवार, ऋषिकेश भोसले, नीतेश पवार, अनिल पाडळकर, बद्री भोसले, सुरेश पवार, विकास राठोड, महेश पवार, ज्ञानेश्वर पवार, विजू जाधव, संजय केदारे आदींची उपस्थिती होती.
जनतेमध्ये राहतो, तोच कॉमन मॅन
जनतेमध्ये राहतो तोच खरा कॉमन मॅन आणि तो माणूस म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. पश्चिम विधानसभा मतदार संघात जीवचे रान करणारे संजय शिरसाट आहेत, ज्याला लोकांचे दुःख समजते तोच खरा नेता, असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. शिरसाट यांच्या प्रचारार्थ मंगळवारी कबीरनगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
रिपाईंचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, बालाजी सूर्यवंशी, किशोर थोरात, नागराज गायकवाड, महेंद्र सोंदवे, राजु जाधव, शेषराव सातपुते, विजय पैठणे, नागराज गायकवाड, संजय ठोकळ, राहुल सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती.
#ElectionWithSakal