मराठी On Uddhav Thackeray And Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आणि भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून एकही उमेदवार उतरवला नव्हता. उलट राज यांनी राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईठाणे, पुणे व कोकणात जाहीर प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. त्यानंतर मनसे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीत सहभागी होईल अशी चर्चा रंगू लागली होती. तसेच राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी), उपमुख्यमंत्री व भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी गाठीभेटी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मनसेची भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती होऊ शकली नाही. मनसेने विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यानंतर राज्यात 150 हून अधिक विधानसभेच्या जागांवर उमेदवार उभे केले. याचदरम्यान ‘दैनिक लोकमत’ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही दोन्ही ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले, पाहा…
राज ठाकरेंचा महायुतीमध्ये समावेश झाला नाही. तसेच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रखर भूमिका घेत नाहीत, असे तुम्हाला वाटते का?, दोन्ही ठाकरेंना तुम्ही आपले प्रतिस्पर्धी मानता का?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. यावर आमची कुणाशीही स्पर्धा नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक लढवण्याची अपेक्षा असते. कुणाला मत द्यायचे ते जनता ठरवेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. आम्ही काय केले ते जनतेसमोर आहे. अडीच वर्षे सत्तेवर राहिलेल्या मविआचे अँटी डेव्हलपमेंट सरकार लोकांनी पाहिले. त्यानंतर सर्व प्रकल्प सुरू करणारे व त्यांना वेगाने पुढे नेणारे, उद्योगस्नेही व कल्याणकारी सरकार लोकांनी पाहिले. लाडक्या बहिणींचे प्रेम आमच्यासोबत आहे. तरुणांना प्रशिक्षण भत्ता आम्ही दिला. त्यामुळे मतदार आमचीच निवड करतील, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
अधिक पाहा..